अज्ञात वाहनाने कट मारला, कापसाचा ट्रक उलटून तरुण ठार

धुळे जिल्ह्यातील मुंगटी येथील ट्रक क्रमांक (एमएच 18 एए 1080) हा ट्रक मुजरासह यावल येथील डांभुर्णी येथे कापूस भरणा करण्यासाठी गेला होता.

अज्ञात वाहनाने कट मारला, कापसाचा ट्रक उलटून तरुण ठार
ट्रक अपघातात एक तरुण ठारImage Credit source: google
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 9:10 PM

जळगाव : अज्ञात वाहनाने कट मारल्याने कापसाचा भरलेला ट्रक रस्त्यालगत उलटल्याची घटना जळगावात घडली आहे. या अपघातात ट्रकमधील एक तरुण जागीच ठार झाला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जळगाव तालुक्यातील ममुराबाद विदगाव रस्त्यावर हा अपघात झाला. जखमींना जळगावतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज रविंद्र अहिरे भिल असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कापूस भरणा करुन मुंगटी येथे परतत होता ट्रक

धुळे जिल्ह्यातील मुंगटी येथील ट्रक क्रमांक (एमएच 18 एए 1080) हा ट्रक मुजरासह यावल येथील डांभुर्णी येथे कापूस भरणा करण्यासाठी गेला होता. गुरुवारी 15 डिसेंबर सकाळी ट्रकमध्ये कापूस भरून परत मुंगटी येथे जाण्यासाठी निघाला होता.

अज्ञात वाहनाने कट मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटले

दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ममुराबाद ते वीदगाव रस्त्यावरील फार्मसी कॉलेजजवळून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारला. यात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला.

हे सुद्धा वाचा

या अपघातात राज रविंद्र अहिरे भिल हा तरुण जागीच ठार झाला. तर प्रमोद संभाजी पाटील (40), भरत दगडू पाटील (32), दिगंबर दिलीप पाटील (30), रविंद्र बारकू भिल अहिरे (50), जितेंद्र पवार (35), निंबा दगडू पाटील (36) आणि बुधा पाटील (60) सर्व राहणार मुंगटी ता. जि.धुळे हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहे. अपघाताची घटना कळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Non Stop LIVE Update
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.