AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! नर्सने 2100 रुपये शकुन मागितले, पैसे न दिल्याने उपचाराविना नवजात बालकाचा मृत्यू

प्रकरणाच्या चौकशीसाठी सीएमओच्या अध्यक्षतेखाली तपास समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती 24 तासात प्रकरणाचा तपास करुन रिपोर्ट देईल.

धक्कादायक ! नर्सने 2100 रुपये शकुन मागितले, पैसे न दिल्याने उपचाराविना नवजात बालकाचा मृत्यू
उपचाराविना नवजात बालकाचा मृत्यूImage Credit source: social
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Dec 15, 2022 | 8:51 PM
Share

बलरामपूर : उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नवजात बालकाच्या जन्मानंतर नर्सने 2100 रुपये शकुन मागितला. मात्र बालकाच्या पालकांनी केवळ 500 रुपये दिल्याने रुग्णालयातील संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी बाळाच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी एकच गोंधळ केला. यानंतर डीएमने चौकशीचे आदेश दिले आहेत.

महिलेची नॉर्मल प्रसुती झाली होती

बेलवा सुलतानजोत येथील रहिवासी मनोजच्या पत्नीला प्रसव वेदना सुरु झाल्याने तिला जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची नॉर्मल प्रसुती झाली. बालकाच्या जन्मानंतर रुग्णालयातील नर्सने मनोजकडे 2100 रुपये शकुनच्या स्वरुपात मागितल्याचा मनोजचा आरोप आहे.

पैसे दिले नाही म्हणून बालकावर उपचार केले नाही

मनोजने नर्सला 500 रुपये दिले. मात्र नर्सने 500 फेकून दिले आणि तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी बालकाची तब्येत बिघडली. मनोजने सदर नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना याबाबत सांगितले. मात्र कुणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. कुणीही बालकावर उपचार करण्यासाठी पुढे आले नाही.

बालकाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा हंगामा

बालकाची तब्येत अधिक बिघडली आणि यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर नातवाईकांना रुग्णालयात गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करत प्रकरण शांत केले.

प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित

मृत बालकाच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सर्व आपबीती सांगितली. प्रकरणाच्या चौकशीसाठी सीएमओच्या अध्यक्षतेखाली तपास समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती 24 तासात प्रकरणाचा तपास करुन रिपोर्ट देईल. यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Follow Us
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?