पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून गावगुंडांची कुटुंबाला मारहाण, मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद

मावळ तालुक्यातील शिवली गावात कदम कुटुंब राहते. कदम कुटुंबियाचा पूर्वीपासूनचा येण्या जाण्याचा रस्ता खोदल्यामुळे त्यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.

पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून गावगुंडांची कुटुंबाला मारहाण, मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद
पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून गावगुंडांकडून मारहाण
Image Credit source: TV9
| Updated on: Feb 14, 2023 | 10:36 AM

मावळ, पुणे / रणजित जाधव (प्रतिनिधी) : रस्ता खोदल्याची पोलिसात तक्रार दिल्याचा राग ठेवून गावगुंडाने कुटुंबाला मारहाण केल्याची घटना मावळ तालुक्यात उघडकीस आली आहे. यासंदर्भात सविता सुरेश कदम यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये तिघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ एका ग्रामस्थाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

येण्या-जाण्याचा रस्ता खोदल्यामुळे तक्रार दिली होती

मावळ तालुक्यातील शिवली गावात कदम कुटुंब राहते. कदम कुटुंबियाचा पूर्वीपासूनचा येण्या जाण्याचा रस्ता खोदल्यामुळे त्यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.

तक्रारीचा राग मनात ठेवून मारहाण

या तक्रारीचा राग मनात ठेवून गावातील कदम कुटुंबाला गावगुंडांनी फावडे, दगडाने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शिवली येथे घडली आहे. सविता कदम, विशाल कदम, रमेश तिखे मारहाणीत जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.