पत्नीला वर्षभरानंतर कळलं पतीने तिच्यापासून घटस्फोट घेतला अन्…

पत्नीशी प्रतारणा करणाऱ्या पतिराजाला उच्च न्यायालयाच्या पायरीवर चांगलाच दणका मिळाला. पत्नीला अंधारात ठेवून तिच्यापासून घटस्फोट मिळवल्याबद्दल उत्तराखंड उच्च न्यायालयाने पतीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पत्नीला वर्षभरानंतर कळलं पतीने तिच्यापासून घटस्फोट घेतला अन्...
तरुणीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीची निर्दोष सुटकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 12:19 AM

डेहरादून : कोरोना काळात घटस्फोटाची अनेक प्रकरणे उजेडात आली. कामधंदा ठप्प झाल्याने पती बराच वेळ घरी राहिला आणि त्यातून पती-पत्नीमध्ये झालेला वाद (Dispute in Husband Wife) घटस्फोटापर्यंत पोहोचला. अशापैकीच एक घटस्फोटाचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणातील पतीने पत्नीला (Wife) थांगपत्ताही लागू न देता तिच्यापासून वर्षभरापूर्वीच घटस्फोट (Divorce) घेतला होता. पतीला दुसऱ्या महिलेबरोबर पाहून पत्नीने त्याबाबत पतीला ज्या विचारला त्यावर पतीने दिलेल्या उत्तरातून पत्नीची झोप कायमचीच उडाली. मी वर्षभरापूर्वीच घटस्फोटाचा आदेश मिळवलाय, असे पतीने सांगितले.

कोर्टाने ठोठावला एक लाखाचा दंड

पत्नीशी प्रतारणा करणाऱ्या पतिराजाला उच्च न्यायालयाच्या पायरीवर चांगलाच दणका मिळाला. पत्नीला अंधारात ठेवून तिच्यापासून घटस्फोट मिळवल्याबद्दल उत्तराखंड उच्च न्यायालयाने पतीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या दंडापैकी 50 हजारांची रक्कम ही पत्नीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तर उर्वरित 50 हजार रुपये राज्याच्या कायदेशीर सेवा विभागाला देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

कुटुंब न्यायालयाने रद्द केला घटस्फोटाचा आदेश

या प्रकरणातील पत्नी लज्जादेवी हिने तिच्या घटस्फोटाच्या आदेशाला आक्षेप घेत कुटुंब न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर कुटुंब न्यायालयाने तिच्या अपिलाचा स्वीकार केला आणि पतीला याआधी मंजूर केलेला घटस्फोट रद्द केला.

यानंतर लज्जादेवीचा पती लालू प्रताप याने थेट उत्तराखंड उच्च न्यायालयात धाव घेतली आणि पत्नीपासून घटस्फोट मिळवण्याचा खटाटोप सुरूच ठेवला. उच्च न्यायालयाने मात्र त्याचे अपील धुडकावून लावले. तसेच पत्नीची फसवणूक केल्याबद्दल त्याला चांगलीच अद्दल घडवली.

मुख्य न्यायमूर्ती विपिन सांगी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने लालू प्रतापला एक लाखाचा दंड ठोठावला.

नेमके प्रकरण काय आहे?

लालूप्रताप आणि लज्जादेवी या दोघांचे 1996 मध्ये लग्न झाले होते. दोघांना 25, 23 आणि 19 वर्षे वयाचे तीन मुलेही आहेत. बरीच वर्षे सुखाने संसार केल्यानंतर दोघांमध्ये छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होऊ लागले.

यानंतर लालूप्रतापने पत्नीकडून छळ झाल्याचा दावा करीत कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. विशेष म्हणजे न्यायालयाने पत्नी लज्जादेवीचे म्हणणे ऐकून न घेताच त्याला घटस्फोट मंजूरही केला होता.

लज्जादेवी हिला ज्यावेळी हा सर्व प्रकार कळला, त्यावेळी तिला मोठा धक्काच बसला. तिने नंतर न्यायासाठी लढा सुरू केला आणि कुटुंब न्यायालयाकडून आधीचा घटस्फोटाचा आदेश रद्द करून घेतला. नंतर तिला उत्तराखंड उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला. तिचा हा लढा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.