AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझी शारीरिक गरज पूर्ण कर अन्यथा… पीडित महिलेचे खासदारावर गंभीर आरोप

विशेष तपास पथकाकडून जेडीएस आमदार एचडी रेवन्ना यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. एसआयटीने त्याच्याविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले आहेत. या प्रकरणी रेवन्ना यांना दुसरी नोटीस (समन्स) बजावण्यात आली आहे. त्यामुळे रेवन्ना यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

माझी शारीरिक गरज पूर्ण कर अन्यथा... पीडित महिलेचे खासदारावर गंभीर आरोप
| Updated on: May 04, 2024 | 6:16 PM
Share

Prajwal Revanna threatened : प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ स्कँडल प्रकरणात कर्नाटकचे खासदार आणि जेडीएसचे माजी नेते प्रज्वल रेवन्ना यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रेवण्णा यांच्याविरोधात दोनदा रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. खासदाराच्या गैरकारभाराबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता आणखी एका तक्रारदाराने रेवण्णाच्या क्रूरतेबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. याआधी प्रज्वल रेवन्ना काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकद खळबळ उडाली आहे.

खासदारावर बलात्काराचा आरोप

हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर 44 वर्षीय माजी पंचायत सदस्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. महिलेने 1 मे रोजी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) नोंदवलेल्या तक्रारीनुसार. तिला आणि तिच्या पतीला गोळ्या घालण्याची धमकी देऊन रेवण्णाने तिच्यावर बलात्कार केल्याचे महिलेने सांगितले. त्यामुळे रेवण्णाविरुद्ध आयपीसी कलम ३७६ अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

होलेनारिसपुरा टाउन पोलिसांनी प्रज्वल रेवन्ना आणि त्याचे वडील एचडी रेवन्ना यांच्याविरुद्ध त्यांच्या घरातील एका माजी कर्मचाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे लैंगिक छळ, पाठलाग आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे.

महिला नेत्याने पोलिसांना सांगितले की 2021 मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या जागांबद्दल बोलण्यासाठी मी प्रज्वल रेवन्ना यांच्या खासदार निवासस्थानी भेटली होती. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, रेवण्णाने तिला वेगळ्या खोलीत बोलावले होते.

महिलेने सांगितले की, रेवण्णाने तिला खोलीत बोलावले आणि दरवाजा बंद केला. महिलेने असा दावा केला की तिने दरवाजा बंद करण्यास आक्षेप घेतला तेव्हा त्याने तिला थांबण्यास सांगितले आणि तसे न केल्यास तिला आणि तिच्या पतीला गोळ्या घालण्याची धमकी दिली.

रेवन्ना याने तिच्या पतीला राजकीयदृष्ट्या पुढे जायचे असेल तर तिने त्याचे ऐकले पाहिजे आणि त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. महिलेने पुढे सांगितले की, “मी नकार देताच त्याने मला धमकी दिली की, माझ्याकडे बंदूक आहे आणि तो मला आणि माझ्या पतीला सोडणार नाही. असे म्हणत त्यानंतर त्याने माझ्यावर बलात्कार केला.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल (३३) हासन येथून लोकसभा निवडणुकीत भाजपा-जेडीएस युतीचा उमेदवार होता, जिथे २६ एप्रिल रोजी मतदान झाले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.