दीडपट मोबदला, आलिशान गाडीचं आमिष दाखवत 12 जणांना गंडा, अशी उघड झाली फसवणूक

12 जणांनी मिळून ऋषिकेश बारटक्के आणि नितीन शहा यांच्याकडे एकूण 3 कोटी 58 लाख रूपये दिले. त्यावेळी ऋषिकेश बारटक्के याने त्याच्याकडील फोर्ड इंडिव्हेअर ही गाडी व्यवहारापोटी आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने देशमुख यांना दिली.

दीडपट मोबदला, आलिशान गाडीचं आमिष दाखवत 12 जणांना गंडा, अशी उघड झाली फसवणूक
गृहकर्ज मंजुर करुन घेत बँकेला गंडाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 5:50 PM

अभिजीत पोते, TV9 मराठी, पुणे : पुण्यात आलिशान गाडी देतो म्हणून पुण्यातील चार जणांनी मिळून 12 जणांना तब्बल 3 कोटी 28 लाख 50 हजारांचा गंडा (Fraud) घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ऋषिकेश अशोक बारटक्के याच्यासह पुण्यातील तिघांविरूध्द विटा पोलीस ठाण्यात (Vita Police Station) गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. नितीन सुभाष शहा, आदित्य दाडे आणि निलमणी धैर्यशील देसाई यांच्या विरोधात विटा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल (Fraud case registered) करण्यात आला आहे. याबाबत माहुली येथील आबासाहेब दत्ताजीराव देशमुख यांनी 3 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली होती.

मुख्य आरोपी बांधकाम व्यावसायिक

ऋषिकेश बारटक्के हा पुणे येथे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो. ऋषिकेशने निलमणी धैर्यशील देसाई याच्या मालकीची पर्वती येथील 49 गुंठे जागा कुलमुखत्यार पत्राद्वारे सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण करून तो विक्री करण्यासाठी घेतल्याचे सांगून देसाईकडून घेतलेले कुलमुखत्यारपत्र देशमुख यांना दाखविले.

दीडपट मोबदला आणि आलिशान कारचे आमिष दाखवले

या जागेमध्ये असलेल्या महसुलच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि जागेमध्ये इतर कामे करण्यासाठी अंदाजे 4 कोटी रूपयांची गरज आहे. या जागेमध्ये त्यांनी गुंतवणूक केल्यास रक्कमेवरती 3 महिन्यामध्ये दीडपट मोबदला बारटक्के आणि शहा हे देतील. तसेच नवीन चारचाकी अलिशान वाहनही देतील, असे आमिष दाखविले.

हे सुद्धा वाचा

ऋषिकेश बारटक्के आणि नितीन शहा यांच्याकडे एकूण 3 कोटी 58 लाख रूपये दिले. त्यावेळी ऋषिकेश बारटक्के याने त्याच्याकडील फोर्ड इंडिव्हेअर ही गाडी व्यवहारापोटी आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने देशमुख यांना दिली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पैशांसाठी पाठपुरावा केला

परंतु बारटक्के याने ही गाडी खरेदी केल्यापासून बँकेचे हप्ते भरणा केलेले नव्हते. तसेच या गाडीवर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचा बोजा असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर देशमुख आणि त्यांच्या सोबतच्या इतर गुंतवणूकदारांनी ऋषिकेश बारटक्के आणि नितीन शहा यांच्याकडे पैशांबाबत पाठपुरावा केला.

चार महिन्यात पैसे देण्याचे मान्य करुनही दिले नाहीत

यानंतर 18 फेब्रुवारी 2020 रोजी करारनामा करून 4 महिन्यांमध्ये पैसे देण्याचे मान्य केले. मात्र चार महिने उलटले तरी बारटक्केने पैसे परत केले नाहीत. त्याच्याकडे पैशासाठी पाठपुरावा केला असता तो टाळाटाळ करु लागला.

देशमुख यांचे 1 कोटी 51 लाख रूपये आणि इतर गुंतवणुकदाराकडील 1 कोटी 77 लाख 50 हजार असे एकूण 3 कोटी 28 लाख 50 हजार रूपये गुंतवणूक स्वरूपात घेऊन त्यावर 3 महिन्यात दीडपट रक्कम करण्याचे अलिशान गाडी देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे.

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.