AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस लिकेज चेक करण्यासाठी माचिस पेटवला, एका पाठोपाठ चार सिलेंडरचा भडका उडाला, चौघे होरपळले

एका सिलेंडरमधून गॅस लिकेज होत असल्याचे तेथील लोकांच्या लक्षात आले. गॅस लिकेज चेक करण्यासाठी एकाने माचिस पेटवला आणि सिलेंडरने पेट घेतला. यानंतर एकापाठोपाठ एक 4 सिलेंडरचा स्फोट झाला.

गॅस लिकेज चेक करण्यासाठी माचिस पेटवला, एका पाठोपाठ चार सिलेंडरचा भडका उडाला, चौघे होरपळले
जोधपूरमध्ये सिलेंडरचा स्फोटImage Credit source: Aaj Tak
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Oct 08, 2022 | 6:41 PM
Share

जोधपूर : नाशिक, मुंबई, सांगलीतील आगीच्या घटना ताज्या असतानाच आता राजस्थामधील जोधपूरमध्ये आगीची घटना उघडकीस आली आहे. गॅस लिकेज चेक करण्यासाठी एका व्यक्तीने माचिस पेटवला आणि धडाधड चार सिलेंडरने पेट घेतला. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे (Gas Cylinder Blast) घरात आगीचा एकच भडका उडाला आणि यात घरातील चार सदस्यांचा होरपळून मृत्यू (Four People Burn Alive) झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. जोधपूरमधील कीर्ती नगरमधील (Jodhpur Kirti colony) रिहायशी कॉलनीतील एका घरामध्ये ही घटना घडली आहे.

स्फोटात चौघांचा मृत्यू, 16 जखमी

मृतांमध्ये दुर्घटनाग्रस्त घरमालकाच्या दोन मुली, एक मुलगा आणि मेव्हण्याचा समावेश आहे. अन्य गंभीर जखमी झालेल्या 16 जणांना उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अधिक जण 80 टक्क्यांहून अधिक भाजले आहेत.

घरात बेकायदेशीर सिलेंडर व्यवसाय सुरु होता

ज्या घरामध्ये स्फोट झाला त्या घरामध्ये बेकायदेशीररित्या सिलेंडरचा व्यवसाय सुरु होता. एका सिलेंडरमधून गॅस लिकेज होत असल्याचे तेथील लोकांच्या लक्षात आले. गॅस लिकेज चेक करण्यासाठी एकाने माचिस पेटवला आणि सिलेंडरने पेट घेतला. यानंतर एकापाठोपाठ एक 4 सिलेंडरचा स्फोट झाला.

हा स्फोट इतका भयानक होता की, बाहेर उभे असलेले काही लोकांपर्यंत आगीच्या झळा पोहचून ते जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ आधी नयापुरा रुग्णालयात आणि नंतर महात्मा गांधी रुग्णालयात हलवण्यात आले.

घराबाहेर उभी असलेली वाहनेही जळाली

घटना घडली तेव्हा सदर घराबाहेर गॅस एजन्सीची गाडी उभी होती. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग इतकी भयानक होती की, घराबाहेर उभी असलेली वाहनेही जळाली आहेत. स्फोटात घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?