AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुम नंबर 404 आणि जीवघेणी साडी… बिल्डरचा टोकाचा निर्णय; ऑफिसच का निवडलं?

इंदूरचे बिल्डर संदीप नागर यांनी जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. पलासिया पोलीस या प्रकरणाचा तिहेरी अँगलने तपास करत आहेत: कौटुंबिक वाद, व्यावसायिक स्पर्धा आणि ब्लॅकमेलिंग. ऑफिसच्या रूम नंबर 404 मध्ये साडीने गळफास घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनेमागील गूढ उकलण्यासाठी पोलीस कुटुंबीय आणि मित्रांची चौकशी करत आहेत.

रुम नंबर 404 आणि जीवघेणी साडी... बिल्डरचा टोकाचा निर्णय; ऑफिसच का निवडलं?
Palasia police stationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 12:56 PM
Share

मध्यप्रदेशातील इंदूरच्या पलासिया पोलीस ठाणे क्षेत्रात बिल्डर संदीप ऊर्फ बंटी नागर यांनी आपल्या कार्यालयातच आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ऑफिसच्या रुम नंबर 404मध्ये त्यांनी गळफास लावून स्वत:ला संपवलं. पोलिसांना प्राथमिक चौकशीत या मागचं काही कारण सापडलेलं नाही. त्यामुळे पोलीस प्रत्येक अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. कौटुंबिक वाद, व्यावसायिक स्पर्धा आणि ब्लॅकमेलिंग आदी तीन अँगलने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जीवन संपवण्यासाठी संदीप नागर यांनी ऑफिसचीच निवड का केली? ते नेहमी या ऑफिसातील रुम नंबर 404 मध्ये एकटे बसायचे. घटना घडली त्या दिवशीही ते ऑफिसात आले होते. काही काळ ऑफिसमध्ये बसल्यानंतर त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.

या रुमशी संबंधित काही खास कारण होतं का? ज्यामुळे नागर यांनी आयुष्य संपवण्यासाठी हा रुम निवडला. किंवा या रुममध्ये कोणी येऊ शकत नसल्याने एकांत मिळू शकेल या हिशोबाने त्यांनी हा रूम निवडला का? आदी गोष्टींचा पोलीस तपास करत आहेत. त्यासाठी नागर यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार तसेच ऑफिस स्टाफचीही चौकशी करण्यात येणार आहे.

तीन दिवसापूर्वी आणली साडी

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असंख्य गोष्टी समोर आल्या आहेत. संदीप नागर यांनी गळफास घेण्यासाठी पत्नीची साडी वापरली होती. विशेष म्हणजे त्यांनी तीन दिवसांपूर्वीच ही साडी पत्नीसाठी आणली होती. नवीनच साडी होती. त्यांनी ही साडी ऑफिसमध्ये आणून ठेवली होती. त्यामुळे त्यांनी जीवन संपवण्याचा आधीच प्लान केला होता का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

साडी ऑफिसात आणण्याचं कारण काय होतं? याचा पोलीस शोध घेत आहेत. या काळात त्यांच्या स्वभावात काही बदल झाला होता का? याचाही शोध घेतला जात आहे. घटना घडली तेव्हा ऑफिसात कोणीच नव्हते. त्याची संधी साधूनच त्यांनी जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे.

कौटुंबीक वाद होता?

सुरूवातीच्या चौकशीत कौटुंबीक कारणही समोर आलं आहे. संदीप नागर यांच्या कुटुंबात वाद सुरू असावा, असा पोलिसांना संशय आहे. मात्र, चौकशी झाल्यावरच याबाबतची पुष्टी होणार आहे. त्यामुळेच पोलीस नागर यांच्या कुटुंबातील लोकांशी आणि त्यांच्या मित्र परिवारांची चौकशी करून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

याशिवाय व्यावसायिक स्पर्धेच्या अँगलकडेही पोलिसांचं लक्ष आहे. इंदौरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मालमत्तेच्या व्यवहारात बऱ्याच घटना घडल्या आहेत. बाहेरच्या मोठ्या कंपन्या येऊन शहरात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे व्यवसायाशी संबंधित तणाव येण्याची शक्यता आहे. नागर यांच्यावर व्यावसायिक दबाव होता का? याचा शोधही पोलीस घेत आहेत. त्यासाठी नागर यांच्या मित्रांची चौकशी करण्यात येणार आहे.

मोबाईलमधून रहस्य उलगडणार?

चौकशीचा तिसरा प्रमुख अँगल ब्लॅकमेलिंगशी संबंधित आहे. पोलिसांनी संदीप नागर यांचा मोबाइल जप्त केला आहे. गेल्या एक महिन्यापासूनची कॉल डिटेल काढून त्याचा तपास करण्यात येणार आहे. नागर यांनी कोणत्या लोकांना या काळात संपर्क केला होता. एखाद्या व्यक्तीशी संदिग्ध चर्चा होत होती का? याचाही पोलीस तपास करत आहेत. रुम नंबर 404, तीन दिवसांपूर्वी ऑफिसात आणलेली साडी, व्यावासायिक स्पर्धा, कौटुंबीक वाद आणि मोबाइलवरील संभाषण आदी गोष्टींचं एकत्रिकरण करून पोलीस या घटनेच्या मूळाशी जात आहेत.

Follow Us
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...