इंदूरच्या राजाचा खोल दरीत मृतदेह, बॉडी जवळ महिलेचा शर्ट, मर्डर मिस्ट्रीच सत्य काय? सोनम कुठे आहे?
गोव्याऐवजी राजा आणि सोनमने नॉर्थ-ईस्टच सौंदर्य पाहण्यासाठी शिलॉन्गला जाण्याचा प्लान केला. पण तिथे जे घडलं, त्यामुळे सगळेच हादरुन गेले आहेत. 2000 फूट खोल दरीत इंदूरच्या राजाचा मृतेदह आढळला. सोबत असलेली पत्नी सोनम गायब आहे. बॉडीजवळ एका महिलेचा सफेद शर्ट आढळलाय. मर्डर मिस्ट्रीच सत्य काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

इंदूरच नवदाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम विवाहानंतर हनीमूनसाठी मेघालयची राजधानी शिलॉन्ग येथे गेले होते. दोघांनी डोळ्यात सुंदर आयुष्याची स्वप्न रंगवली होती. पण एका भयानक घटनेने सगळ उद्धवस्त झालं. 11 मे 2025 रोजी राजा रघुवंशीच सोनम सोबत लग्न झालं. 20 मे रोजी दोघे शिलॉन्ग येथे पोहोचले. 23 मे रोजी दुपारी 1.43 वाजता दोघे बेपत्ता झाले. 11 दिवसाच्या शोध मोहिमेनंतर 2 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला. सोहराच्या वेईसॉडॉन्ग तलावाजवळ एका खोल दरीत हा मृतदेह सापडला. पत्नी सोनम गायब आहे. तिचा शोध लागलेला नाही. तिचं अपहरण झाल्याची कुटुंबाला भिती आहे. पोलिसांनी ही हत्या असल्याच मानून तपास सुरु केला आहे. पण प्रश्न हा आहे की, राजाची हत्या कोणी केली? आणि सोनम कुठे आहे?
राजाचा मोठा भाऊ सचिन रघुवंशी या घटनेबद्दल बोलताना म्हणाला की, “ही दुर्घटना नसून हत्या आहे. माझा भाऊ मारला गेलाय. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. आम्हाला आमची सून सोनमला काहीही करुन शोधून काढायचं आहे” नातेवाईकांनी सांगितलं की, बेपत्ता होण्याच्या काही वेळ आधी राजा आपल्या आईसोबत बोलला होता. सोनम सुद्धा सासूसोबत बोललेली. आईने जेव्हा राजाला विचारलं की, तू जेवलास का?. त्यावेळी आता केळ खातोय असं राजाने उत्तर दिलं. दोघांमध्ये डोंगरावर जाण्यासंबंधी बोलण झालं. आई-मुलामधील हे फोनवरील शेवटच संभाषण होतं.
रात्री एका होमस्टेमध्ये थांबले
राजा (29) आणि सोनमच (27) 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न झालं. कुटुंब या लग्नामुळे खुश होतं. गोव्याऐवजी राजा आणि सोनमने नॉर्थ-ईस्टच सौंदर्य पाहण्यासाठी शिलॉन्गला जाण्याचा प्लान केला. दोन महिन्याआधी तिकीट बुक केलं. 20 मे रोजी दोघांनी आसामला कामाख्या देवीच दर्शन घेतल्यानंतर शिलॉन्गला पोहोचले. 22 मे रोजी भाड्याच्या स्कुटीवरुन मावलखियात गावात गेले. तिथल्या नोंग्रियाट गावातील फेमस ‘लिविंग रूट ब्रिज’ पाहण्यासाठी 3000 पायऱ्या उतरुन गेले. रात्री एका होमस्टेमध्ये थांबले. 23 मे च्या सकाळी तिथून निघाले. त्यानंतर काही तासाने बेपत्ता झाले.
एका महिलेच सफेद शर्ट मिळालं
24 मे रोजी त्यांची स्कूटी शिलॉन्ग-सोहरा मार्गावर एका कॅफेजवळ उभी असलेली दिसली. राजाचा मृतदेह सापडला तिथून ही जागा 25 किलोमीटरवर आहे. GPS ट्रॅकरवरुन समजलं की, 23 मे रोजी स्कूटी एडी व्यू पॉइंट, मावक्मा येथे काहीवेळासाठी थांबली होती. 11 दिवसांनी 2 जून रोजी ड्रोनच्या मदतीने राजाचा मृतदेह खोल दरीत सापडला. मृतदेह खराब झालेला. चेहरा ओळखता येत नव्हता. हातावर ‘RAJA’ नावाचा टॅटू आणि स्मार्टवॉचवरुन मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मृतदेहाजवळ रक्ताने माखलेलं धारदार शस्त्र, एका महिलेच सफेद शर्ट, पेंटरा 40 गोळीची स्ट्रिप, तुटलेला मोबाइल आणि राजाच स्मार्टवॉच मिळालं.
