मित्राच्या बायकोशीच अनैतिक संबंध.. नवऱ्याला कळताच रात्रीतून केलं गायब अन् सकाळी डेडबॉडी शेतात…जळगाव हादरलं

जवळगावमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात बायकोचे तिच्या नवऱ्याच्या मित्रासोबतच प्रेमसंबंध होते. नवऱ्याला याबाबत कळाल्यानंतर मित्राने धक्कादायक पाऊल उचलले. आता नेमकं काय झालं? जाणून घ्या...

मित्राच्या बायकोशीच अनैतिक संबंध.. नवऱ्याला कळताच रात्रीतून केलं गायब अन् सकाळी डेडबॉडी शेतात...जळगाव हादरलं
Jalgaon
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 14, 2026 | 1:12 PM

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेचे नवऱ्याचा मित्राशी अनैतिक संबंध होते. नवऱ्याला याबाबात माहिती मिळाली होती. त्यानंतर नवऱ्याने बायकोला मित्रासोबत रंगेहात देखील पकडले होते. मात्र, बायकोच्या मित्राने राग डोक्यात घालून घेतला होता. त्याने थेट त्याचा काटा काढण्याचाच निर्णय घेतला. पण त्यासाठी ज्या प्रकारे प्लान आखला तो ऐकून पोलिस देखील हादले.

ही भयानक घटना जळगावमधील रावेर येथी घडली आहे. शेतात आढळलेल्या ३० वर्षीय मजुराच्या मृत्यूचे गूढ रावेर पोलिसांनी उलगडले आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून दोन मित्रांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली असून मुख्य संशयिताचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं होतं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शेख कुरबान शेख शब्बीर (वय ३०) ऐनपुर हा रात्रीपासून बेपत्ता होता. सकाळी विनायक पाटील नांदूरखेडा यांच्या गट नंबर 96 शिवारातील कपाशीच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपासाची दिशा बदलली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. एप्रिल २०२६ मध्ये ऐनपूर येथे दोघांना रंगेहात पकडल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेचा राग मनात धरून त्याने मयताला “तू आमच्या संबंधांमध्ये आला तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे.

तपासात धक्कादायक माहिती समोर

रात्री गणेश घोरपडे व मेघराज वसंत सांगळे यांनी मयताला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेले. तेथे हाताने गळा आवळून त्याची हत्या केली आणि मृतदेह कपाशीच्या शेतात टाकून दोघे पसार झाले, असा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे. मयताचा भाऊ शेख सलमान शेख शब्बीर (रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Follow Us