
शेतीच्या वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची भयानक घटना जळगाव जवळ घडली. धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या पत्नीला शेजाऱ्यानेच मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे समजताच दुसरीकडे त्या महिलेच्या पतीला हार्ट अटॅक आला आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी वसंत ताडे आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. पण या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अशोक ढगे असे मृताचे नाव असून तो शेतकरी आहे. जळगाव जामोद पोलिस स्टेशन हद्दीतील सुनगाव येथील अशोक ढगे यांच्या पत्नीला शेजारच्या शेतकऱ्याने शेतीच्या वादातून मारहाण आणि शिवीगाळ केली. ती बातमी ढगे यांचा समजली आणि ती ऐकून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच त्यांचा मृत्यू झाला.
शेतात झाडांना पाणी द्यायला गेल्या..
याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी वसंत ताडे आणि इतर लोकांवर कलम ११८(१)११५(२),३५१(३),३५२,३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ चे कलम ९२(अ),९२(ब) अन्वये गुन्हा दाखल केलाय . मृतक शेतकरी अशोक ढगे यांचे सुनगाव शेत शिवारात शेती असून त्या शेतीचा वाद गेल्या कित्येक महिन्यापासून चालू आहे.
दरम्यान अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे या त्यांच्या मुलासह, प्रतीक ढगे याच्यासह शेतामध्ये संत्र्याच्या झाडाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांच्या शेताशेजारी असणारे आरोपी वसंता ताडे यांनी क्षुल्लक कारणावरून मुलगा प्रतीक ढगे यास काठीने मारहाण केली. त्याचवेळी त्याची आई कुसुम ढगे या मुलाला वाचवण्यासाठी मध्ये पडल्या मात्र वसंत ताडे यांनी अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे हिला सुद्धा शिवीगाळ करून मारहाण केली. ही संपूर्ण घटना अशोक यांना समजली. पत्नीला मारहाण झाल्याचे ऐकताच अशोक ढगे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्य झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सुनगावमध्ये हळहळ व्यक्त होत अलून ढगे कुटुंबावर तर शोककळा पसरली आहे.
पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.