
पती-पत्नीच्या पवित्र नात्याला कलंकीत करणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने प्रियकराच्या साथीने मिळून पतीची हत्या केली. मृतकाची ओळख पटली असून त्याचं नाव लुम्बा उरांव आहे. त्याचा मृतदेह गावाबाहेरील एका झुडूपात मिळाला. लुम्बाचा मृतदेह मिळताच गावात एकच खळबळ उडाली. झारखंडची राजधानी रांचीमधील हे प्रकरण आहे. याची सूचना ग्रामीण आणि नातेवाईकांनी तात्काळ पिठोरिया पोलिसांना दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. या हत्येचा छडा लावण्यासाठी रांचीचे एसएसपी चंदन कुमार सिन्हा यांच्या निर्देशावरुन ग्रामीण एसपी प्रवीण पुष्कर यांच्यातर्फे एक टीम बनवण्यात आली.
टीमने मृतकाच्या कुटुंबाशी चर्चा केली. पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी मृतक लुम्बा उरांवची पत्नी गीता देवी आणि तिचा प्रियकर इरफान अंसारीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीतून समोर आलं की, मागच्या 8 वर्षांपासून मृतक लुम्बा उरांव याची पत्नी गीता देवी और इरफान अंसारी यांच्यात अनैतिक संबंध होते. पत्नीच्या अनैतिक संबंधांबद्दल समजताच लुम्बा उरावने विरोध सुरु केला. या दरम्यान प्रियकर इरफान अंसारी आणि लुम्बा उरावमध्ये हाणामारी सुद्धा झाली. प्रियकर इरफान अन्सारी प्रेमात इतका बुडालेला की, सारासार विचारशक्ती तो गमावून बसलेला. पत्नी गीताने मनोमन नवऱ्याला शत्रू बनवून टाकलेलं. लुम्बा उरावंच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी इरफान आणि गीताने खोलीत आणि घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला.
वेगवेगळ्या व्हिडिओचा अभ्यास सुरु केला
कॅमेऱ्याच्या माध्यमातून लुम्बाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात होतं. दोघांनी यूट्यूबवर हत्येसंदर्भातील वेगवेगळ्या व्हिडिओचा अभ्यास सुरु केला. दीडवर्षांपासून गीता आणि तिचा प्रियकर इरफान, लुम्बा उरांवच्या हत्येच प्लानिंग करत होते. 20 ऑगस्टला बुधवारी गीताने पती लुम्बा उरावला बीएयूजवळ भाड्याच घर पाहण्यासाठी बोलावलं. हा एक कट होता.
लुम्बाला भरपूर दारु पाजली
त्यानंतर सुनियोजित षडयंत्रानुसार, त्याला एक कोल्ड ड्रिंक प्यायला दिलं. त्यात नशेच्या 10 ते 15 गोळ्या मिसळलेल्या. त्यानंतर गीता आणि इरफानने लुम्बाला भरपूर दारु पाजली. त्यानंतर पुन्हा घरी सोडण्याच्या बहाण्याने लुम्बाला ओमनी कारमध्ये बसवलं. रस्त्यातच इरफान अन्सारीने गीतासमोर लुम्बाचा गळा आवळून त्याची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह गावाच्या बाहेर निर्जन स्थळी फेकून दिला. जास्त दारु पिल्यामुळे झुडूपात पडून त्याचा मृत्यू झाला असं वाटाव असा आरोपींचा प्रयत्न होता.