AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांना पाहून पळ काढत होता, संशय आला म्हणून पोलिसांनी झडती घेतली तर…

कल्याणमध्ये गुन्हेगारी कमी होण्याचे नावच घेत नाही. रोज काही ना काही घटना उघडकीस येतात. कल्याण जीरपीने शस्त्रांसह एका तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांना पाहून पळ काढत होता, संशय आला म्हणून पोलिसांनी झडती घेतली तर...
कल्याण जीआरपी आणि आरपीएफकडून शश्त्र घेऊन फिरणारा आरोपी अटकImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 08, 2023 | 10:12 AM
Share

कल्याण : कल्याणवरून नाशिकला जिवंत काडतूस आणि चाकू घेऊन जाणाऱ्या आरोपीला कल्याण जीआरपी आणि आरपीएफने कसारा स्टेशनवरून बेड्या ठोकल्या आहेत. स्वप्नील गोसावी असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर दरोडा, घरफोडी, जबरी चोरी सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे जिवंत काडतूस कशासाठी घेऊन जात होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. कल्याणमध्ये वारंवार अशा घटना उघडकीस येत आहेत. वाढती गुन्हेगारी रोखणं पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

अंगझडती घेतली असता जिवंत काडतूस आणि चाकू आढळला

कल्याण जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांना कसारा स्टेशन दरम्यान एका तरुणावर संशय आल्याने त्याची चौकशी केली. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून दोन जिवंत काडतूस आणि चाकू असल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, स्वप्नील गोसावी असे या आरोपीचे नाव असून हा आरोपी नाशिकचा राहणारा आहे. तो कल्याणवरून नाशिकला जाण्यासाठी निघाला, मात्र कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने मेल आणि एस्प्रेस गाडीचा प्रवास न करता कल्याणहून लोकल ट्रेनचा प्रवास सुरु केला.

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

कसारा स्टेशनवर उतरत ते नाशिकच्या दिशेने जात असताना जीआरपी आणि आरपीएफ जवानांना बघून तो घाबरत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने लगेचच जीआरपी आणि आरपीएफ जवानांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. आरोपीवर नाशिक पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या ही जिवंत काडतूस कशासाठी घेऊन जात होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Follow Us
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...