Kalyan News : पोलिस स्टेशनच्या दारातचं सुनेला सासच्यांकडून बेदम मारहाण, पोलिस म्हणतात…

कल्याणमध्ये पोलीस स्टेशनच्या जवळचं एका विवाहित महिलेला सासारकडच्या लोकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीनंतर गायत्री परमार वय वर्ष 20 ही महिला जखमी झाली आहे. मात्र पोलीस स्टेशनच्या बाहेर हा प्रकार घडल्याने लोकांनी आणि पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Kalyan News : पोलिस स्टेशनच्या दारातचं सुनेला सासच्यांकडून बेदम मारहाण, पोलिस म्हणतात...
khadakpada policeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 7:32 AM

सुनिल जाधव, कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan News) एक धक्कादायक प्रकार घडला आहे, सुनेला सासरच्या लोकांकडून पोलिस स्टेशनच्या (kalyan police) बाहेरचं मारहाण केली असल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. त्यामुळे पोलिस आणि नागरिकांनी सुध्दा आच्छर्य व्यक्त केलं आहे. सासरच्या लोकांनी मारहाण केल्यानंतर गायत्री परमार या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी (kalyan Crime News) सहा जणांवरती गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समजली आहे. विशेष म्हणजे एक वर्षापूर्वी गायत्रीचा विवाह कल्याणमध्येच राहणाऱ्या चंदन परमार यांच्यासोबत झाला होता. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर चंदन हा किरकोळ कारणावरुन गायत्रीशी वाद घालत असल्याचा आरोप केला आहे.

महिला निवारण कक्षात दोनवेळा चर्चा झाली

साधारण एक वर्षापूर्वी गायत्रीचा विवाह कल्याणमध्ये राहणाऱ्या चंदन परमार यांच्यासोबत झाला होता. लग्नाच्या महिनाभरानंतर चंदन हा किरकोळ कारणावरुन गायत्रीशी वाद घालू लागला असा आरोप चंदनवरती करण्यात आला आहे. त्यानंतर गायत्रीला तो मारहाण करू लागला, गायत्रीने याबाबत बाजरपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर खडकपाडा येथील महिला तक्रार निवारण कक्षात देखील अर्ज केला होता. फेब्रुवारी 16 पासून गायत्री ही आपल्या माहेरी बिर्ला शाळेजवळ, कल्याण येथे राहत होती. महिला निवारण कक्षात दोनवेळा चर्चा झाली. शेवटच्या मिटिंगवेळी गायत्रीने आपण चंदन परमार याच्यासोबत नांदत नसल्याचं सांगितले. त्याचप्रमाणे गुन्हा ही दाखल करणार असल्याच ती म्हणाली होती.

हे सुद्धा वाचा

निवारण कक्षातील बैठकीनंतर…

निवारण कक्षातील बैठकीनंतर सर्वजण खाली आले. त्यावेळी परमार कुटुंबाने गायत्री व तिच्या आई वडिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. गायत्रीने ही बाब पोलिसांना सांगितली, पण पोलिसांनी योग्य ते सहकार्य केले नाही उलट अर्धा तास थांबा त्यांना आधी जाऊ द्या मग तुम्ही जा असा सल्ला दिला. त्यानुसार गायत्री व तिचे आई वडील अर्धा तासाने बाहेर पडले. मात्र बारावे गांव रिक्षा स्टॅण्ड, पटेल मार्ट जवळ परमार कुटुंबीयांनी गायत्री व तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. चंदनच्या भावाने गायत्रीला दगड मारल्यामुळे तिला दुखापत झाली. पोलिसांनी आधीच तक्रार घेतली असती, तर हे सर्व घडलं नसत असं गायत्रीच म्हणणं आहे. पती नामे चंदन विनोद परमार, सासरे विनोद विरा परमार, सासु हेमा विनोद परमार, दिर दिपेश विनोद परमार व अन्य दोघांविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...