कल्याणच्या सापर्डे हत्या प्रकरणाला वेगळं वळण, 20 तोळे सोन्यासाठी महिलेची हत्या, सख्ख्या आईवर गोळी झाडली

| Updated on: Feb 27, 2021 | 11:36 PM

कल्याणच्या सापर्डे गावातील हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळताना दिसत आहे (Kalyan Saparde Murder case man murdered woman for jewelry).

कल्याणच्या सापर्डे हत्या प्रकरणाला वेगळं वळण, 20 तोळे सोन्यासाठी महिलेची हत्या, सख्ख्या आईवर गोळी झाडली
Follow us on

कल्याण (ठाणे) : कल्याणच्या सापर्डे गावातील हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळताना दिसत आहे. आरोपीने सुरुवातीला प्रेम संबंधातून महिलेची हत्या केली, असा खुलासा केला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात आता वेगळी माहिती समोर आली आहे. आरोपी पवन म्हात्रेने महिलेच्या गळ्यातील 20 तोळे सोने लुटण्यासाठी तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर महिलेची हत्या करत असताना आरोपीच्या आईने बघितले म्हणून त्याने स्वत:च्या आईची गोळी झाडली. आरोपी पवन म्हात्रेच्या या खुलाश्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत (Kalyan Saparde Murder case man murdered woman for jewelry).

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील सापर्डे गावात चार दिवसांपूर्वी एका महिलेची हत्या करण्यात आली. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली होती. आरोपी पवन म्हात्रे याने सुवर्णा गोडे या महिलेचा खून केला होता. पोलिसांनी याप्रकरणी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी आरोपीने संबंधित महिलेचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा प्रकार घडला. या झटापटीत त्याची आई जखमी झाली, असं आरोपीने पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, आता खडकपाडा पोलिसांच्या तपासात या घटनेला वेगळं वळण मिळाले आहे (Kalyan Saparde Murder case man murdered woman for jewelry).

पवनची गुन्ह्याची कबुली

आरोपी पवन याने लूटीच्या इराद्याने सुवर्णा गोडे हीला हळदी कार्यक्रमाच्या रात्री काही बहाण्याने घरात नेले. तिथे त्याने महिलेच्या गळ्यातील 20 तोळे सोने हिसकावून तिला गोळी मारली. ही घटना पवनची आई भारतीने पाहिली. त्यामुळे पवनने आईला सुद्धा गोळी मारली. सध्या पवनच्या आईवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोपीचा दुसऱ्या महिलेला लुबाडण्याचा इरादा होता

विशेष म्हणजे पवनने त्यारात्री एका दुसऱ्या महिलेला सुद्धा याच इराद्याने घरात वरच्या माळ्यावर नेले होते. ती महिला खाली आल्याने ती बचावली. पवन म्हात्रे या लूटीसाठी अनेक दिवसापासून प्लान करीत होता. मध्यप्रदेशातून आलेल्या दोन तरुणांकडून त्याने पिस्तूल घेतली होती. त्याने कल्याणच्या रौनक सिटी परिसरात फायरिगंचे ट्रेनिंग घेतली. पवनकडून 20 तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या घटनेमुळे कल्याणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या : माझ्यावर प्रेम अन् दुसऱ्यांकडे पाहते म्हणून महिलेची हत्या, सापर्डेतील ‘त्या’ खुनाचा उलगडा