Kalyan News : कल्याणमध्ये धक्कादायक घटना ! शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, गाडीचीही तोडफोड,3 जखमी

कल्याणमध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. कार्यालयासमोर सुरू असलेले भांडण सोडवताना मध्यस्थी केल्याने त्यांना व इतर दोघांना मारहाण करण्यात आली. जखमींना रुग्णालयात नेत असतानाच त्यांच्या गाडीवर पुन्हा हल्ला झाला. या घटनेने शहरात राजकीय खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

Kalyan News : कल्याणमध्ये धक्कादायक घटना ! शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, गाडीचीही तोडफोड,3 जखमी
कल्याणमध्ये जीवघेणा हल्ला
Updated on: Oct 18, 2025 | 11:24 AM

कल्याण (Kalyan News) शहरात शिवसेनचे (शिंदे गट) माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर अज्ञात इसमांकडून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयानक हल्ल्यात बोरकगावकर आणि आणखी दोघे, असे तीन जण जखमी झाले आहेत. कार्यालयासमोर सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी बोरगांवकर गेले होते, ते मध्यस्थी करत होते. जखमी झालेल्या इसमाला ते रुग्णालयात घेऊन जात होते, मात्र तेवढ्यातच त्यांच्या गाडीवर जोरदार हल्ला करण्यात आला. गाडीची तोडफोड करण्यात आली. हल्लेखोरांनी बोरगांवकर व इतर दोघांना जबर मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच कल्याण महात्मा फुले पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी माजी नगरसेवकाची तक्रार नोंदवून घेत आरोपींचा शोध सुरू केला. जखमींुैकी एकाची प्रकृती गदंभीर आहे, त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकावर असा जीवघेणा हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय झालं ?

मिळालेल्य माहितीनुसार, मजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या कार्यालयाबाहेर ज्ञानेश्वर सपाट आणि त्यांचा मुलगा ओंकार सपाट यांना काही अज्ञात व्यक्ती मारहाण करत होते. कार्यालयासमोर भांडण होत असल्याचे पाहून माजी नगरसेवक बोरगावकर यांनी तातडीने मध्यस्थी केली आणि दोघांचे भांडण सोडवले. या मारहाणीत जखमी झालेले ज्ञानेश्वर सपाट यांना उपचारासाठी बोरगावकर स्वतः आपल्या कारमधून कल्याणच्या रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयाकडे घेऊन जात होते.

पुन्हा परतून चढवला जीवघेणा हल्ला, गाडीचीही तोडफोड 

मात्र याचवेळी अज्ञात हल्लेखोर पुन्हा परतले. त्यांनी त्या रुग्णालयाच्या बाहेर पुन्हा एकदा बोरगावकर यांच्या गाडीवर हल्ला करत तोडफोड केली आणि माजी नगरसेवक तसेच गाडीतील ज्ञानेश्वर आणि ओंकार सपाट यांना पुन्हा जबर मारहाण केली. या हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, ज्ञानेश्वर सपाट आणि ओंकार सपाट हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू होते. मात्र, ज्ञानेश्वर सपाट हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले.

बोरगावकर आणि ओंकार सपाट किरकोळ जखमी आहेत. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच कल्याण महात्मा फुले पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी माजी नगरसेवकाची तक्रार नोंदवून घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे. माजी नगरसेवकावर झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.