बायकोनेच नवऱ्याच्या खिशात ठेवले सेक्स कॅप्सूल, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले
बायकोनेच नवऱ्याच्या खिशात शक्तिवर्धक कॅप्सूलचे 8 रॅपर टाकले. आबिद अलीच्या मृत्यूवर शबाना खूप रडली. ती खूप दु:खात आहे, असं कुटुंब आणि पोलिसांना वाटलं पाहिजे असा तिचा प्रयत्न होता. पण शक्तिवर्धक कॅप्सूलच्या मागचं सत्य समोर आलच.

कानपूरमध्ये एका विवाहित महिलेने असं कांड केलं की, पोलीसही हैराण झाले. महिलेने नवऱ्याचा मृत्यू औषधाच्या ओव्हरडोसमुळे झाल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला. तिने नवऱ्याच्या खिशात शक्तीवर्धक कॅप्सूलचे 8 रॅपर टाकले. सुरुवातीला पोलिसांनाही ओव्हडोसची थ्योरी योग्य वाटली. पोस्टमार्टमनंतर मृतदेहाच दफन करण्यात आलं. पुढच्याच दिवशी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर ते वाचून पोलिसांना धक्काच बसला. त्यामध्ये हत्येच कारण काही दुसरच होतं. उत्तर प्रदेश कानपूरच हे प्रकरण आहे. कानपूरच्या बिठूर पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. आबिद अली पत्नी आणि मुलासोबत रहायचा. 19 जानेवारीला आबिदची पत्नी शबानाने पोलिसांना कळवलं की, नवऱ्याचा शक्तीवर्धक औषधाच्या ओव्हरडोसने मृत्यू झालाय.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. आबिदच्या खिशात शक्तीवर्धन कॅप्सूलचे रॅपर मिळाले. शरीरावर कुठलीही जखम नव्हती. त्यावेळी पोलिसांना असं वाटलं की, कदाचित शबाना खरं बोलतेय. पती आबिद अलीच्या मृत्यूवर शबाना खूप रडली. ती खूप दु:खात आहे, असं कुटुंब आणि पोलिसांना वाटलं पाहिजे असा तिचा प्रयत्न होता. पोलिसांनी मृतदेहाच शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबियांनी दफनविधी केला. इथपर्यंत सर्व ठीक होतं. पण दुसऱ्यादिवशी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर शबानाचा पोलखोल झाली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून मृत्यू झाल्याच म्हटलं होतं. त्यामुळे ओव्हरडोसची कथा रचण्यात आल्याच स्पष्ट झालं.
त्या रात्री काय झालेलं?
पोलिसांनी शबानाची कसून चौकशी केली. तिच्या मोबाइलचे कॉल डिटेल तपासले. त्यावेळी समजलं की, त्या रात्री शबानाच रेहान नावाच्या युवकाबरोबर बोलण झालं होतं. पोलिसांनी रेहानला उचललं. दोघांच्या चौकशीतून सत्य समोर आलं. शबाना आणि रेहानची मैत्री वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर झाली. आबिद घरी नसताना तो शबानाला भेटायला यायचा. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. आबिदला समजल्यानंतर त्याने विरोध सुरु केला. त्यानंतर दोघांनी मिळून आबिदला मार्गातून हटवण्याचा प्लान केला.
पण सत्य समोर आलच
गुन्ह्याच्या रात्री आबिद झोपल्यानंतर शबानाने रेहान आणि त्याचा मित्र विकासला घरी बोलावलं. त्यानंतर तिघांनी गळा दाबून आबिदची हत्या केली. हत्येचा संशय येऊ नये म्हणून शक्तीवर्धक कॅप्सूलच्या सेवनाच्या ओव्हरडोसने मृत्यू झाल्याच दाखवण्याचा प्रयत्न केला. पण सत्य समोर आलच.