
बंगळुरु : एका दुकानदाराला मारहाण झाल्याच प्रकरण समोर आलय. काही जणांनी मिळून दुकानदाराला मारहाण केली. दुकानात भक्ती गीत सुरु होतं, असं पीडीत व्यक्तीचा आरोप आहे. हे भक्ती गीत बंद करण्यासाठी काही लोक आले व त्यांनी मारहाण केली. या जखमी दुकानदाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवलाय. बंगळुरुच्या नगरथपेटेमध्ये ही घटना घडली.
दुकानदाराच म्हणण असं आहे की, त्याच्या दुकानात हनुमान चालीसा सुरु होती. त्यावेळी सहा लोक तिथे आले. अजानची वेळ असल्याच सांगून हनुमान चालीसा बंद करायला सांगितली. त्यावरुन दुकानदार आणि युवकांमध्ये शाब्दीक वादावादी झाली. आरोपी युवकांनी दुकानदाराला मारहाण केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
कसलं दुकान होतं?
स्थानिक दुकानदारांनी बराच विरोध केल्यानंतर बंगळुरुच्या हलासुरू गेट पीएस पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. पोलिसांनी सुलेमान, शाहनवाज, रोहित, दानिश आणि तरुण विरोधात गुन्हा नोंदवलाय. पीडित व्यक्तीच मुकेश नगरथपेटेमध्ये मोबाइलच दुकान आहे. त्याच्या शेजारीच प्रार्थना केंद्र आहे. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास आरोपी तिथे आले. त्यांनी भक्ती गीत बंद करायला सांगितलं. त्यावरुन वाद झाला. आरोपी युवकांनी दुकानदाराला मारहाण केली. त्यात तो जखमी झाला.
‘खुलेआम हिंदुंना धमकावल जातय’
या घटनेवर भाजपा कर्नाटकने ‘X’ वर पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिलीय. BJP ने लिहिलय की, “कर्नाटकला काँग्रेसच्या तुष्टिकरणाच्या राजकारणाची किंमत चुकवावी लागतेय. कट्टरपंथी अतिवादी तत्वांनी रस्त्यावर कब्जा केलाय. खुलेआम हिंदुंना धमकावल जातय. जेव्हापासून काँग्रेस सत्तेत आलीय, तेव्हापासून कर्नाटकमध्ये धर्मतंत्र हावी झालय”