AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MVA | ‘उगाच हट्ट करु नका, आमचा निर्णय झालाय’, ‘या’ लोकसभा जागेवरुन काँग्रेसचा ठाकरे गटाला इशारा

MVA | हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ठाकरे गटाने हट्ट करु नये. जिल्ह्यात 600 गाव आहेत. ठाकरे गटाचे 10 टक्के ग्रामपंचायतीत तरी लोकनियुक्त सरपंच आहेत का?" असा सवाल काँग्रेस नेत्याने केला. "महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार आणि ठाकरे गट असे तीन पक्ष आहेत. व्यक्तीगत भूमिका मांडा. पण कोणी एकानेच मविआची भूमिका सांगू नये"

MVA |  'उगाच हट्ट करु नका, आमचा निर्णय झालाय', 'या' लोकसभा जागेवरुन काँग्रेसचा ठाकरे गटाला इशारा
maha vikas aghadi
| Updated on: Mar 18, 2024 | 1:48 PM
Share

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. पण महाविकास आघाडीचा अद्यापपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. काही नेते अधिकृत घोषणा होण्याआधी काही जागांवर दावा करत आहेत. त्यातून महाविकास आघाडीमधील विसंवादच अधिक दिसून येऊ लागला आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील एका जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरु असल्याच पहायला मिळतय. ‘उगाच हट्ट करु नका, आमचा निर्णय झालाय’ असा स्पष्ट शब्दात काँग्रेस नेत्याने ठाकरे गटाला या जागेवरील दावा मागे घ्यायला सांगितला आहे. ठाकरे गट सांगलीच्या लोकसभा जागेवर दावा करत आहे. त्याला विश्वजीत कदम यांनी उत्तर दिलं आहे. “देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा, सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. महाराष्ट्राला, देशाला अभिमान वाटेल असं दूरदृष्टी, कौतुकास्पद नेतृत्व सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला काँग्रेसच्या विचारातून दिलेलं आहे. म्हणून या काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच राहिला पाहिजे” असं विश्वजीत कदम म्हणाले.

“मविआ एकत्र आली. देशात जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी मविआ लोकसभेची निवडणूक लढतेय याच आनंद आहे. सांगलीच्या जागेवर मविआमधील घटक पक्षाने अधिकार सांगण्याच कारण नाही. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच रहाणार आहे. अशी विनंती महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. ही जागा काँग्रेसकडे राहणार यावर ठाम आहोत” असं विश्वजीत कदम म्हणाले. “चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी आहेत. पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. पण राजकारण, समाजकारण करताना विचारधारेच पाठबळ लागत. सांगलीत दृष्काळाचा प्रश्न आहे. प्रश्न सोडवण्याची भूमिका सातत्याने ठेवावी लागते. चंद्रहार पाटील यांनी सहा ते सात दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे” असं विश्वजीत कदम म्हणाले.

‘ठाकरे गटाचे 10 टक्के ग्रामपंचायतीत तरी लोकनियुक्त सरपंच आहेत का?’

“सांगली लोकसभा मतदारसंघ मागण्याची शिवसेनेची भूमिका चुकीची आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ठाकरे गटाने हट्ट करु नये. सांगलीत 600 गाव आहेत. ठाकरे गटाचे 10 टक्के ग्रामपंचायतीत तरी लोकनियुक्त सरपंच आहेत का?” असा सवाल विश्वजीत कदम यांनी केला. “काँग्रेस पक्ष सांगलीची जागा लढवण्यास व जिंकण्यास सक्षम आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार आणि ठाकरे गट असे तीन पक्ष आहेत. व्यक्तीगत भूमिका मांडा. पण कोणी एकानेच मविआची भूमिका सांगू नये” असं ते म्हणाले.

Follow Us
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...