Drown in River | फोटोशूट जीवावर, नदीत बुडून नवविवाहित तरुणाचा मृत्यू, नववधूची प्रकृती गंभीर

नदीच्या पाण्यात बुडून नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. नदी किनारी फोटो शूट करताना हा प्रकार घडल्याचं बोललं जातं. मात्र घटनेच्या आदल्या दिवशीही त्यांनी त्याच नदी परिसरात फोटोशूट केले होते.

Drown in River | फोटोशूट जीवावर, नदीत बुडून नवविवाहित तरुणाचा मृत्यू, नववधूची प्रकृती गंभीर
नदीत बुडून नवरदेवाचा मृत्यूImage Credit source: एएनआय
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 10:05 AM

तिरुअनंतपुरम : नदीत बुडून नवविवाहित तरुणाचा मृत्यू (Newly Wed) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तर त्याच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. नदी किनारी फोटो शूट (Photo Shoot) करत असताना हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. केरळातील कोझीकोडमध्ये कुटीआडी नदी (Kuttiady river) किनारी सोमवारी ही हृदयद्रावक घटना घडली. जानकी अरण्यात वाहणाऱ्या नदीवर पोस्ट वेडिंग फोटो शूट करताना नवविवाहित दाम्पत्याचा अपघात झाल्याचं बोललं जातं. कोझीकोडमधील पलेरी येथे राहणारा राजील या घटनेत मृत्युमुखी पडला. तर त्याची पत्नी कनिहा हिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या नदीत बुडून आधीही अनेक जणांनी प्राण गमावले आहेत.

नेमकं काय घडलं?

नदीच्या पाण्यात बुडून नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. नदी किनारी फोटो शूट करताना हा प्रकार घडल्याचं बोललं जातं. मात्र घटनेच्या आदल्या दिवशीही त्यांनी त्याच नदी परिसरात फोटोशूट केले होते. फोटोशूट करताना ते पाण्यात बुडाल्याचे बोलले जात असले तरी, फोटोशूट रविवारीच झाले असल्याने स्थानिक, पोलिस आणि छायाचित्रकारांनी याचा इन्कार केला.

आंघोळ करताना नदीत लाटा

नवरदेव आणि नववधू दोघेही कुटुंबातील इतर सदस्यांसह नदीत आंघोळीसाठी आले होते. कुटीआडी नदीत अचानक लाटा उसळून अपघात झाल्याच्या अनेक घटना याआधीही उघडकीस आल्या आहेत. नदीपात्रात बुडून अनेकांनी यापूर्वीही प्राण गमावले आहेत. या घटने वेळीही स्थानिकांनी दोघा जणांना वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले तर राजीलने अखेरचा श्वास घेतला.

संबंधित बातम्या :

लेकरासह पत्नीचे प्राण वाचवूनच जीव सोडला, पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात बुडून पित्याचा मृत्यू

जळगावहून मित्रांसोबत गोव्याला, लाटेसोबत वाहून गेल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

मित्रांसोबत पोहायला गेला, पण परतलाच नाही; पुण्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.