AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माता झाली वैरीण, तीन वर्षांच्या मुलीची हत्या करून ट्रेनमधून मृतदेह फेकला

तिला पाच मुले होती, तीन मुले पतीसोबत रहात होती. तर दोन मुलींसोबत ती प्रियकरासोबत रहात होती. तिने प्रियकराच्या मदतीने तीन वर्षांच्या किरणचा गळा दाबून हत्या केली. त्या मुलीचा मृतदेत त्यांनी धावत्या ट्रेनमधून नदीत फेकण्याचा प्रयत्न तर केला परंतू भलतेच घडले

माता झाली वैरीण, तीन वर्षांच्या मुलीची हत्या करून ट्रेनमधून मृतदेह फेकला
पालघरमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्याने जीवन संपवलेImage Credit source: socialmedia
| Updated on: Jan 20, 2023 | 5:20 PM
Share

जयपूर : एका पाच मुलांच्या आईला आणि तिच्या प्रियकरास तीन वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या करून तिचा मृतदेह चालत्या ट्रेनमधून खाली फेकून दिल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या मुलीचा मृतदेह मंगळवारी हिंदुमलकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रेल्व पटरीवरून हस्तगत करण्यात आला आहे. या मुलीची ओळख पटवून तिची आई सुनीतापर्यंत पोलीस पोहचले. पोलीसांनी या दोघांना अटक केली आहे. आईनेच पोटच्या पोरीचा गळा घोटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहीतीनूसार सुनीता या एका पाच मुलांच्या आईने 16-17 जानेवारीच्या रात्री आपल्या प्रियकराच्या मदतीने या तीन वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. सुनीता तिचा प्रियकर सन्नी उर्फ मालता सोबत शास्रीनगर परिसरात रहात होता. तिची तीन मुले तिच्या पतीकडे रहात होती. तर चार वर्षांची आणि तीन वर्षांची मुलगी तिच्यासोबत रहात होते. 16-17 जानेवारीच्या रात्री त्यांनी किरण या तीन वर्षीय मुलीचा गळा प्रियकराच्या मदतीने चादरने गुंडाळून तिचा खून केला. त्याच रात्री ते दोघे गंगानगर रेल्वे स्थानकाकडे गेल्याचे पोलीसांनी सांगितले.

गंगानगरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांना सांगितले की ‘महिला आणि तिचा प्रियकर सकाळी 6.10 वा. ट्रेनमध्ये बसले. स. 6.45 आणि 7 वाजण्याच्या सुमारास पहिली ट्रेन फतूही रेल्वे स्टेशनजवळील नदी पुलावर ट्रेन पोहचताच चालत्या ट्रेनमधून त्यांनी मुलीचा मृतदेह फेकला. त्या मृतदेह नदीच्या पात्रात फेकायचा होता. परंतू त्यांच्या दुर्दैवाने मृतदेह पटरीवरच पडल्याने गुन्हा घडल्याचे लवकर समजले. त्यानंतर ते अबोहर रेलवे स्टेशनला गेले आणि अन्य एका ट्रेनने पुन्हा गंगानगरला परतले. तपासाअंती मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या या दोघा आरोपीना अटक करण्यात आले

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.