अत्यंत क्रूरता, हैवानियत प्रायवेट पार्टवर जखमा, महिला डॉक्टर बरोबर जे झालं, त्याने सगळेच हादरले

पीडितेचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येतं होतं. चेहरा आणि नखांवर जखमा होत्या. पीडितेच्या प्रायवेट पार्टवर सुद्धा जखमा झालेल्या. पोट, गळा, ओठ आणि उजव्या हातावर जखमा आहेत. महिला डॉक्टर बरोबर जे झालं, त्याने सगळ्यांच्या मनात संतापाची भावना आहे.

अत्यंत क्रूरता, हैवानियत प्रायवेट पार्टवर जखमा, महिला डॉक्टर बरोबर जे झालं, त्याने सगळेच हादरले
rg kar hospital female junior doctor murder case
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 1:28 PM

आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरसोबत अत्यंत भयानक घटना घडली आहे. महिला डॉक्टरवर अत्यंत क्रूर, अमानवीय अत्याचार करण्यात आले. महिला डॉक्टरसोबत जे झालं, त्याने सगळ्यानाच हादरवून सोडलय. महिला डॉक्टरवर आधी बलात्कार करण्यात आला. त्यानंतर अत्यंत निदर्यतेने तिची हत्या करण्यात आली. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. महिला डॉक्टर मेडीकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एक अटक केली. स्थानिक पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

शरीरावर कुठे-कुठे जखमा

ती ट्रेनी डॉक्टर सेकंड ईयरची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी बेशुद्धवस्थेत सेमिनार हॉलमध्ये सापडली. तिला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण तपासल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बंगाल पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. शव विच्छेदनातून लैंगिक छळ आणि त्यानंतर हत्या झाल्याच समोर आलं आहे. पीडितेचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येतं होतं. चेहरा आणि नखांवर जखमा होत्या. पीडितेच्या प्रायवेट पार्टवर सुद्धा जखमा झालेल्या. पोट, गळा, ओठ आणि उजव्या हातावर जखमा आहेत.

रुग्णालय व्यवस्थापनाची भूमिका संशयास्पद

रुग्णालय व्यवस्थापनाची भूमिका संशयास्पद आहे. मुलीने जीवन संपवून घेतल्याची आम्हाला माहिती देण्यात आली होती, असा मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे. रुग्णालयाला हे प्रकरण दाबायच आहे, असा नातेवाईकांचा आरोप आहे. महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर आरजी कर मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गदारोळ केला. चिडलेले डॉक्टर संपावर गेले आहेत. सकाळी 3 ते 6 च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षदर्शींची जबानी पोलिसांनी नोंदवून घेतली आहे.

सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.