AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुचाकीवरुन आले अन् रोकड लुटून पळाले, भरदिवसा घडलेल्या घटनेने जिल्ह्यात खळबळ

आजकाल गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. जळगाव शहरात भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दुचाकीवरुन आले अन् रोकड लुटून पळाले, भरदिवसा घडलेल्या घटनेने जिल्ह्यात खळबळ
भरदिवसा बँकेत सशस्त्र दरोडाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 01, 2023 | 2:27 PM
Share

जळगाव : गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. दिवसाढवळ्या होत असलेले गुन्हे पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जळगाव शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत भरदिवसा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी लाखो रुपयांची रोकड लांबवली. बँकेतील अंदाजे 15 लाखांपेक्षा रूपयांची रोकड लांबविल्याची प्राथमिक माहिती मिळते. याप्रकरणी स्थानिक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

शस्त्राचा धाक दाखवून लुटले

दोन जण सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन आले. दोघांनी दुचाकी बँकेजवळ थांबवली आणि बँकेत घुसले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच-सहा कर्मचार्‍यांना धमकावले. व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केले. यानंतर त्यांनी बँकेतील रोकड लांबवून पलायन केले.

शहरात नाकाबंदी सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून, तपास सुरू केला आहे. घटनेसंदर्भात मुक्ताईनगर पोलीस हे अलर्ट झाले असून, नाकाबंदी करून वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. बँकेतून चोरट्यांनी मोठी रक्कम व सोने लांबवली आहे. परंतु पोलीस तापसानंतर आकडा कळेल अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिलीय.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...