
पती-पत्नीच नातं पवित्र मानलं जातं. विश्वास हा या नात्याचा पाया आहे. पत्नी मोठ्या विश्वासाने पतीच्या घरी येते. हे सात जन्माच नातं मानलं जात. पण काहीवेळा या नात्यात जोडीदाराकडून मोठा विश्वासघात होतो. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात अशीच एक पती-पत्नीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना घडली आहे. हे खूपच लज्जास्पद प्रकरण आहे. इथे पतीने त्याच्या मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पत्नीला भाग पाडलं. या मित्राने सुद्धा महिलेवर अत्याचार केला. पीडितेने या प्रकरणात नंतर शून्य एफआयआर नोंदवला. महिलेची कहाणी ऐकून पोलीसही सून्न झाले.
महिलेचा पती धार जिल्हा मुख्यालयापासून 35 किलोमीटर दूर कानवन पोलीस ठाणे क्षेत्राच्या हद्दीत राहतो. त्याची पत्नी इंदूर येथे राहते. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या पतीला जुगाराचा नाद होता. जुगारामध्ये त्याला 50 हजार रुपये कर्ज झालं होतं. हे कर्ज चुकवता न आल्याने पत्नीलाच एका मित्राला विकून टाकलं. आरोपीने महिलेवर अत्याचार केला. कानवन पोलीस ठाण्याचे प्रभारी अभय नीमा यांनी सांगितलं की, “महिलेचा आरोप आहे की, तिचा पती जुगारी आहे. याच त्याच्या सवयीमुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यामुळे त्याने माझा सौदा केला”
महिलेच्या तक्रारीत आरोप काय?
कर्जात बुडालेल्या नवऱ्याने मला त्याच्या एका मित्रासोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले. या मित्राकडून महिलेच्या नवऱ्याने 50 हजार रुपये उधार घेतले होते. महिलेने तिच्या तक्रारीत हा आरोप केलाय. कानवन पोलीस ठाण्याचे प्रभारी अभय नीमा यांनी ही माहिती दिली. पोलीस सध्या फरार दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.
पीडितेची जबानी नोंदवली
तक्रारीनुसार, पती कर्ज चुकवू शकत नव्हता. म्हणून त्याने त्याच्या एकामित्रासोबत पत्नीचा सौदा केला. कर्ज फेडण्यासाठी त्याने मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पत्नीला भाग पाडलं. धारचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) गीतेश कुमार गर्ग म्हणाले की, “प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पीडितेची जबानी इंदूरमध्ये नोंदवून घेण्यात आली आहे”