Vastu Shastra : पती-पत्नीचं पटत नाही? सतत भांडणं होतात? मग तुमच्या घरात आहेत हे वास्तुदोष
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, जे तुम्हाला तुमच्या घरात जर काही वास्तुदोष निर्माण झाले असतील तर त्याबाबत माहिती देतेच परंतु त्यावर उपाय देखील सांगते. घरात अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडणं होतात, त्याला देखील वास्तुदोष कारणीभूत असू शकतो, आज आपण त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार अनेकदा आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. जसं की घरात देवी-देवतांच्या प्रतिमा लावणं हे शुभ मानलं गेलं आहे, ज्यामुळे तुमच्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते, वाईट शक्तींपासून तुमचा बचाव होतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार देवी देवतेच्या प्रतिमा या घरात नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच हव्यात काही उत्तर दिशेला लावल्या तरी चालतील, मात्र दक्षिण दिशेकडे तोंडकडून देवांच्या प्रतिमा लावू नयेत, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा भविष्यात तुम्हाला त्रास होतो, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, आणि त्याचा परिणाम हा तुमच्या दाम्पत्य जीवनावर होतो.
चुकीच्या दिशेला बेडरूम – जर तुमच्या बेडरूमची दिशा चुकली असेल तर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. पती-पत्नीमध्ये वाद होतात. वास्तुशास्त्रानुसार बेडरूम नैऋत्य दिशेला असणं शुभ मानलं जातं. ज्यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढतं, घरात शांतता राहाते. तसेच तुमच्या बेडच्या समोर लगेचच आरसा देखील नसावा, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. यामुळे विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, घरात गृहकलह वाढतो.
तुटलेलं फर्निचर – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही तुटलेलं फर्निचर नसावं, घरात तुटलेलं फर्निचर, भंगार सामान किंवा खराब झालेल्या इलेक्ट्रिक आणि इलेक्टॉनिक्स वस्तू ठेवणं हे अशुभ मानलं जातं. यामुळे घरात आर्थिक तंगी येते, एवढंच नाही तर घरातील वातावरण नेहमी अशांत राहतं, पत्नी-पत्नीमध्ये सतत वाद होण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे असं सामान घरात ठेवू नये.
घराचा रंग – वास्तुशास्त्रानुसार घराला आतील बाजुला नेहमी फेंट रंग द्यावेत अतिशय भडक अशाप्रकारचे रंग असू नयेत, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा पती-पत्नीच्या नात्यावर होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
