स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, छाप्यात दहा जणी सापडल्या, ‘चौघीं’चं झालेलं लिंगबदल

| Updated on: Jan 09, 2022 | 12:26 PM

स्पा सेंटरच्‍या नावाखाली देह व्यापाराचा धंदा चालत असल्‍याची माहिती इंदौर क्राईम ब्रांचला मिळाली होती. त्यावर महिला पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत 18 मुला-मुलींना घटनास्थळी अटक केली

स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, छाप्यात दहा जणी सापडल्या, चौघींचं झालेलं लिंगबदल
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पर्दाफाश केला होता. यामध्ये अनेक परदेशी तरुणींनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केल्यानंतर पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांनी सांगितले की, अॅटम स्पा सेंटरमधून 10 मुली आणि 8 मुलांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 7 मुली थायलंडच्या होत्या, परंतु त्यापैकी चौघी जणी लिंग बदल शस्त्रक्रिया केलेल्या होत्या. पासपोर्टमध्ये त्यांचे मूळ जेंडर स्पष्ट झाले आहे. अन्य तिघांच्या पासपोर्टची माहिती गोळा करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

स्पा सेंटरच्‍या नावाखाली देह व्यापाराचा धंदा चालत असल्‍याची माहिती इंदौर क्राईम ब्रांचला मिळाली होती. त्यावर महिला पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत 18 मुला-मुलींना घटनास्थळी अटक केली. ज्यामध्ये 10 मुली आणि 8 मुले होती. स्पा सेंटर ऑपरेटर संजयने पोलिसांना सांगितले की, त्याने अॅटम स्पाची फ्रँचायझी घेतली आहे. याआधी त्याने स्वत:ला स्पा व्यवस्थापक असल्याचे सांगितले होते.

सात मुली थायलंडहून, पासपोर्टमुळे खुलासा

महिला पोलिस स्टेशन प्रभारी ज्योती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 मुली थायलंडमधून आल्या असून त्यापैकी केवळ चौघींचे थायलंडचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. या चारही पासपोर्टमध्ये या मुलींचे जेंडर पुरुष लिहिलेले असून या मुली स्पा सेंटरमध्ये लिंग बदलून देहव्यापार करत होत्या. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. संजयची पोलीस कोठडी मागणार असून त्याची कसून चौकशी केली जाणार आहेत.

दोन महिन्यांपूर्वी बांगलादेशातून मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणणाऱ्या दलालाला इंदूरमधील विजयनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली होती. दोन मुली आणि चौघा जणांना पकडण्यात आले होते. दलालाने चौकशीदरम्यान सांगितले होते की, तो बांगलादेशातून मुलींना इंदूरला आणायचा आणि देहव्यापारासाठी वापरायचा.

संबंधित बातम्या :

ट्रकच्या धडकेत लातूर-औरंगाबाद बसचा चेंदामेंदा, भीषण अपघातात सहा जण जागीच ठार, आठ गंभीर

वादावादीतून टोकाचं पाऊल, आधी बायकोची हत्या, मग नवऱ्याचे विषप्राशन

61 वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची प्रसुती, कोल्हापुरात खळबळ