वादावादीतून टोकाचं पाऊल, आधी बायकोची हत्या, मग नवऱ्याचे विषप्राशन

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील ही घटना आहे. योगिता बावणे असं 35 वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. तर 42 वर्षीय आरोपी पती राजू बावणे याच्यावर गोंडपिंपरी येथे उपचार सुरु आहेत.

वादावादीतून टोकाचं पाऊल, आधी बायकोची हत्या, मग नवऱ्याचे विषप्राशन
चंद्रपुरात पतीकडून पत्नीची हत्या
निलेश डाहाट

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 09, 2022 | 11:11 AM

चंद्रपूर : कुऱ्हाडीने वार करुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर पतीनेही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पती यातून बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पतीने हे टोकाचं पाऊल का उचललं, याचा नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. चंद्रपुरात हा प्रकार घडला.

काय आहे प्रकरण?

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील ही घटना आहे. योगिता बावणे असं 35 वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. तर 42 वर्षीय आरोपी पती राजू बावणे याच्यावर गोंडपिंपरी येथे उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं?

शनिवारी रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले. ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पती यातून बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

मुरुडमध्ये रिक्षा उलटून अपघात, डोंबिवलीकर दाम्पत्याचा करुण अंत

61 वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची प्रसुती, कोल्हापुरात खळबळ

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें