Video : औरंगाबादच्या माळीवाड्यात भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा, पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून रोकड लुटली

औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथे भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा पडला. भरदिवसा सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारासची ही घटना आहे. पैशांची मोजणी सुरु असलेली रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले.

Video : औरंगाबादच्या माळीवाड्यात भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा, पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून रोकड लुटली
औरंगाबादमधल्या माळीवाडा इथल्या पेट्रोल पंपावर भरदिवसा दरोडा
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 1:22 PM

औरंगाबाद : जिल्ह्यातील माळीवाडा येथे भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा पडला. भरदिवसा सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारासची ही घटना आहे. पैशांची मोजणी सुरु असलेली रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले.

नेमकं काय झालं?

सकाळी दडा-साडे दहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावर कॅश मोजण्याचं काम सुरु होतं. त्याचवेळी दरोडेखोर पेट्रोल पंपावर आले. तोंड बांधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हा दरोडा टाकला. यावेळी त्यांनी मोजणी चालू असलेली रक्कम घेऊन पोबारा केला.

सविस्तर माहिती अशी की, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावरील कर्मचारी रक्कम मोजत होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती तोंड बांधून आले. त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकला.

भरदिवसा सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. भर दिवसा पडलेल्या धाडशी दरोड्यामुळे परिसरासह औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.

व्हिडीओ पाहा –

(Maharashtra Aurangabad Maliwada Robbery at petrol pump)

हे ही वाचा :

आमच्या गाडीला कट का मारला? चाकणमध्ये वादात गुंतवून कारमधील 12 लाखांची चोरी

परदेशातून कुटुंबाला भेटायला वसईत, वॉकिंग करताना मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मालेगावात वाढती गुन्हेगारी, पोलिसांची धडक कारवाई, 10 तलावारींसह चौघांना अटक