परदेशातून कुटुंबाला भेटायला वसईत, वॉकिंग करताना मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वसईत वॉकिंगसाठी गेलेल्या 27 वर्षीय तरुणाला मद्यधुंद नशेत असलेल्या दुचाकी स्वाराने धडक दिली आहे. या धडकेत या युवकाचा जागीच मृत्यू झाला. वसईच्या सनसिटी रस्त्यावर बुधवारी (11 ऑगस्ट) संध्याकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.

परदेशातून कुटुंबाला भेटायला वसईत, वॉकिंग करताना मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
विजय गायकवाड

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 12, 2021 | 9:15 AM

वसई : वसईत वॉकिंगसाठी गेलेल्या 27 वर्षीय तरुणाला मद्यधुंद नशेत असलेल्या दुचाकी स्वाराने धडक दिली आहे. या धडकेत या युवकाचा जागीच मृत्यू झाला. वसईच्या सनसिटी रस्त्यावर बुधवारी (11 ऑगस्ट) संध्याकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. मनीष मनोहर सिंह कार्की (वय 27) असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो नुकताच परदेशातून वसई पश्चिमेतील सनसिटी परिसरात आपल्या कुटुंबाकडे आला होता, अशी माहिती मिळाली आहे.

“बघ्यांची गर्दी, पण कुणीही जखमीला तात्काळ रुग्णालयात नेलं नाही”

वसई पश्चिमेतील सनसिटी परिसरात सकाळ संध्याकाळ नागरिक फेरफटका मारण्यासाठी जात असतात. बुधवारीही मोठ्या संख्येने नागरिक संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी आले होते. याच दरम्यान मद्यपान करून भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकी स्वाराने त्याठिकाणी वॉकिंग करत असलेल्या युवकाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार फरार झाला आहे. अपघात होताच घटनास्थळावर बघ्यांची गर्दी झाली, पण जखमी तरुणाला तात्काळ कुणीही रुग्णालयात दाखल केले नाही.

उपचाराअभावी तरुणाने जीव सोडला

काही वेळाने त्याठिकाणी पोहचलेल्या तरुणांनी त्याला रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उपचाराअभावी तरुणाचा जीव गेला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी महेश चवडा आणि अस्लम शेख यांनी दिलीय. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

चंद्रपूर दारु बंदी उठवण्याच्या विरोधात 100 पेक्षा अधिक संघटना एकटवल्या, मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने सत्याग्रह

तरूणांकडे आज रोजगार नाही, पण दारूची बाटली सहज उपलब्ध करून दिली जातेय : प्रविण दरेकर

‘चंद्रपूरमधील दारूबंदी लागू करा, अन्यथा क्रांती दिनी पुरस्कार परत करणार’, पुरस्कार्थींची घोषणा

व्हिडीओ पाहा :

Alcoholic biker hit walking youngster dead in Vasai

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें