पुणे : चोरांकडून चोरीसाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जातात. पुण्यातील चाकणमध्ये 3 जणांनी कारमधून 12 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जाणाऱ्यांसोबत मुद्दाम वाद केला. त्यांनी रोख रक्कम असलेल्या कारला अडवून कार चालकासोबत आमच्या मोटारसायकलला कट का मारला असा जाब विचारत वाद केला. दोघांनी चालकाला वादात गुंतवून ठेवलं आणि एकाने त्याचा फायदा घेत कारमधील 12 लाख रुपयांची रोकड चोरली. ही घटना रविवारी (8 ऑगस्ट) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास चाकणमधील तळेगाव चौकात घडली.