धुळ्यात भरदिवसा ‘ खाकी ‘ रक्तबंबाळ, बाईकला कट मारल्याचा वाद, PSI वर चाकूहल्ला

समोरुन येणाऱ्या दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन दुचाकीस्वाराने वाद घातला. त्यानंतर मागचा पुढचा विचार न करता थेट खाकीवरच घाव घातला. या हल्ल्यात पीएसआय मिर्झा जबर जखमी झाले आहेत.

धुळ्यात भरदिवसा ' खाकी ' रक्तबंबाळ, बाईकला कट मारल्याचा वाद, PSI वर चाकूहल्ला
जखमी पोलीस अधिकारी मिर्झाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 1:29 PM

धुळे : धुळे शहरात सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही, अशी ओरड कायम असते. आता मात्र ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे ती खाकीच सुरक्षिक नाही की काय, असा सवाल उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. धुळ्यात (Dhule Crime) भरदिवसा खाकी रक्तबंबाळ झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. किरकोळ कारणावरुन एका फौजदारावर वर्दळीच्या रस्त्यावर चाकू हल्ला (Knife Attack) झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

काय आहे प्रकरण?

शिरपूरचे महामार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी पीएसआय एम.आय. मिर्झा हे त्यांच्या दुचाकीने श्रीराम पेट्रोल पंपाकडून बारापत्थर रस्त्याकडे जात होते. यावेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन दुचाकीस्वाराने वाद घातला. त्यानंतर मागचा पुढचा विचार न करता थेट खाकीवरच घाव घातला.

PSI मिर्झा हल्ल्यात गंभीर जखमी

अज्ञात दुचाकीस्वाराने पीएसआय मिर्झा यांच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मिर्झा जबर जखमी झाले आहेत. त्यांना धुळ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुपारी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.

संबंधित बातम्या :

काळही आला, वेळही आली, मधमाशांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी कालव्यात उडी, तरुणाचा बुडून मृत्यू

जेसीबीनं तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयत्न, वाळूमाफियाच्या कृत्यानं वैजापुरात खळबळ!

चंद्रपूरमधील काँग्रेस नगरसेवकाचे हल्लेखोर अटक, हटकल्याच्या रागातून केला होता हल्ला

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.