VIDEO | विद्यार्थिनी झाल्या रणरागिणी, रोज छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोला धू-धू-धुतलं

शाळेत ये-जा करण्याच्या मार्गावर छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोला शाळेतील विद्यार्थिनींनी चांगलाच चोप दिला. एकटी-दुकटी मुलगी असल्याचं पाहून हा टवाळखोर त्यांना त्रास देत असे.

VIDEO | विद्यार्थिनी झाल्या रणरागिणी, रोज छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोला धू-धू-धुतलं
जळगावात रोड रोमियोला चोप
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 2:35 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी रणरागिणींचं रुप घेतल्याचं पाहायला मिळालं. नेहमी छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोला (Road Romeo) शाळेतील विद्यार्थिनींनी (Students) चांगलाच चोप दिला. नेहमी एकट्या-दुकट्या मुलींना पाहून हा टवाळखोर त्रास देत असे. मात्र मंगळवारी विद्यार्थिनींनी एकत्र येत रोड रोमिओला चांगलेच धुतले. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील येवती भागात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी त्यांची छेड काढणाऱ्या तरुणाला धडा शिकवला. या घटनेचा व्हिडीओ (Video) समोर आला आहे. बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. अशातच रोड रोमियोंनी छेड काढण्याचे प्रकार वाढल्याने विद्यार्थिनींची चिंता वाढली होती.

काय आहे प्रकरण?

शाळेत ये-जा करण्याच्या मार्गावर छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोला शाळेतील विद्यार्थिनींनी चांगलाच चोप दिला. एकटी-दुकटी मुलगी असल्याचं पाहून हा टवाळखोर त्यांना त्रास देत असे. अखेर हिंमत दाखवत मंगळवारी विद्यार्थिनी एकत्र आल्या आणि त्यांनी रोड रोमिओला चांगलेच धुतले.

नेमकं काय घडलं?

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील येवती भागात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी छेड काढणाऱ्या तरुणाला धडा शिकवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विद्यार्थिनींच्या हिमतीला दाद दिली जात आहे.

बस बंद असल्याने पायपीट

घर ते शाळा या मार्गावरील बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. अशातच रोड रोमियोंनी छेड काढण्याचे प्रकार वाढल्याने विद्यार्थिनींच्या त्रासात भर पडली होती. तर त्यांच्या पालकांची चिंता वाढली होती.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांची चाकूने भोसकून हत्या, बिहारमधील धक्कादायक घटना

नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

बारा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, ट्यूशन चालकाला बेड्या