अल्पवयीन मुलीचा सासरी नांदण्यास नकार, कोल्हापुरात बापाने लेकीला नदीत ढकललं

मुलगी अल्पवयीन असतानाही बापाने तिचा विवाह जबरदस्ती लावून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. सासरी नांदायला नकार दिल्याने बापानेच तिला नदीत ढकलून जीवे मारल्याची प्राथमिक माहिती आहे.

अल्पवयीन मुलीचा सासरी नांदण्यास नकार, कोल्हापुरात बापाने लेकीला नदीत ढकललं
नदीत ढकलून मुलीला संपवलं, मग स्वतःच पोलिसात तक्रार
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 9:31 AM

कोल्हापूर : सासरी नांदायला नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला बापानेच नदीत ढकललं असल्याचा संशय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं. चार दिवसांपूर्वी पित्यानेच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. आता मुलीचा मृतदेह दूधगंगा नदी पात्रात आढळला आहे.

नेमकं काय घडलं?

मुलगी अल्पवयीन असतानाही बापाने तिचा विवाह जबरदस्ती लावून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. सासरी नांदायला नकार दिल्याने बापानेच तिला नदीत ढकलून जीवे मारल्याची प्राथमिक माहिती आहे. चार दिवसांपूर्वी पित्यानेच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कोल्हापुरातील कुरुंदवाड पोलिसात दिली होती.

दूधगंगा नदी पात्रात मृतदेह आढळला

बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय मुलीचा मृतदेह दूधगंगा नदी पात्रात आढळला आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. कुरुंदवाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मध्य प्रदेशात मुलीकडून वडिलांची हत्या

दुसरीकडे, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 58 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दहा दिवसांनंतर या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांची मुलीनेच हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनी आपल्या बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याचा राग मुलीच्या मनात धुमसत होता.

संबंधित बातम्या :

प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांचा मुलीनेच काटा काढला, बॉयफ्रेण्डच्या मित्रामार्फत खून

मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा