Kolhapur | मानोली धरणाजवळ पत्र्याची पेटी, उघडून पाहिल्यावर तिशीतील महिलेचा मृतदेह

कोल्हापुरात पत्र्याच्या पेटीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध आंबा या मुख्य गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात हा प्रकार घडला.

Kolhapur | मानोली धरणाजवळ पत्र्याची पेटी, उघडून पाहिल्यावर तिशीतील महिलेचा मृतदेह
पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 8:26 AM

कोल्हापूर : पत्र्याच्या पेटीत अज्ञात महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळल्याने कोल्हापुरात (Kolhapur) एकच खळबळ उडाली आहे. मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. शाहूवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खून आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी गळा आवळून महिलेची हत्या (Murder) केल्याचा पोलिसांना संशय आहे. संबंधित महिला 30 ते 32 वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज आहे.

काय आहे प्रकरण?

कोल्हापुरात पत्र्याच्या पेटीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध आंबा या मुख्य गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात हा प्रकार घडला.

महिलेचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयितांनी महिलेचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत घालून टाकला. कोल्हापुरातील शाहूवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खून आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गळा आवळून खून झाल्याचा संशय

सात ते आठ दिवसांपूर्वी महिलेचा गळा आवळून खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मयत महिला 30 ते 32 वर्ष वयोगटातील असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. बेपत्ता असणाऱ्या महिलांच्या नातेवाईकांनी तसेच घटनेची माहिती असणाऱ्या नागरिकांनी शाहूवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

उल्हासनगरातील महिलेची हत्या करणाऱ्याला बेड्या, लिव्ह इन जोडीदाराने केली होती महिलेची हत्या

Jalna Murder : जालन्यात तरुण ट्रक चालकाची दगडाने डोकं ठेचून हत्या

एका वर्षाच्या चिमुरडीसमोर आईची हत्या, लिव्ह इन पार्टनरला अटक