जालना : जालन्यातील भोकरदनमधून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 23 वर्षाच्या ट्रक चालका (Truck Driver)ची दगडाने डोकं ठेचून हत्या (Murder) करण्यात आली आहे. भोकरदन-जालना रोडवरील सोयगाव देवी फाट्यावर ही घटना घडली. भगवान तळेकर असं हत्या करण्यात आलेल्या ट्रक चालकाचं नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून भगवान बेपत्ता होता. तळेकर याची हत्या कुणी आणि का केली ? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Young truck driver killed in Jalna for unknown reasons)