VIDEO : दारुच्या नशेत भान हरपलं अन् चाकू घेऊन नाचणं जीवावर बेतलं, मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

VIDEO : दारुच्या नशेत भान हरपलं अन् चाकू घेऊन नाचणं जीवावर बेतलं, मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना
दारुच्या नशेत भान हरपलं अन् चाकू घेऊन नाचणं जीवावर बेतलं

गोपाळ असे जखमी होऊन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोपाळने स्टंटबाजीच्या नादात स्वतःच्या छातीवर 3 ते 4 वार केले. यामुळे त्याच्या छातीत गंभीर जखम झाली अन् रक्तस्त्राव होऊ लागला. नाचण्याच्या नादात कुणाच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. मात्र रक्तस्त्राव वाढल्याने इतरांच्या ही बाब लक्षात आली मात्र तोपर्यंत उशिर झाला होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 19, 2022 | 4:14 PM

मध्य प्रदेश : देशात मोठ्या उत्साहात होळी आणि धुळवड साजरी करण्यात आली. यावेळी मद्यधुंद अवस्थेत चाकू घेऊन नाचणे एका तरुणा्या जीवावर बेतले आहे. नाचताना हातातील चाकू (Knife) लागून एका तरुणाचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना इंदूरच्या बाणगंगा परिसरात घडली आहे. पाच तरुण दारुच्या नशेत तर्राट होऊन नाच करत होते. यापैकी एक तरुण हातात चाकू घेऊन स्टंट (Stunt) करत होता. स्टंट करताना त्याने दारु आणि नाचण्याच्या धुंदीत छातीवर वार करण्याची अॅक्शन करीत होता. मात्र यामध्ये त्याच्या छातीत गंभीर जखम झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Young man stabbed to death while dancing under the influence of alcohol)

स्टंटबाजी करताना छातीत जखम झाल्याने मृत्यू

गोपाळ असे जखमी होऊन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोपाळने स्टंटबाजीच्या नादात स्वतःच्या छातीवर 3 ते 4 वार केले. यामुळे त्याच्या छातीत गंभीर जखम झाली अन् रक्तस्त्राव होऊ लागला. नाचण्याच्या नादात कुणाच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. मात्र रक्तस्त्राव वाढल्याने इतरांच्या ही बाब लक्षात आली मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. तेथे उपस्थित लोकांनी तात्काळ त्याला अरबिंदो रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणांचा डान्स सुरु असताना कुटुंबिय मोबाईलमध्ये शूट करीत होते. यामुळे ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे. (Young man stabbed to death while dancing under the influence of alcohol)

इतर बातम्या

Video : ओव्हरटेकच्या नादात लक्झरी बसची फलकासह आजोबांना धडक, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघात, रसायनाचा टँकर 25 फूट खोल कोसळला, ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें