AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ओव्हरटेकच्या नादात लक्झरी बसची फलकासह आजोबांना धडक, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

परिसरातील नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त ठिकाणी धाव घेत आजोबांना उचलून उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. संबंधित वाहनचालक हा संधीचा फायदा उचलत घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही सर्व घटना बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

Video : ओव्हरटेकच्या नादात लक्झरी बसची फलकासह आजोबांना धडक, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
ओव्हरटेकच्या नादात लक्झरी बसची फलकासह आजोबांना धडक
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 3:17 PM
Share

धुळे : शिरपूर तालुक्यातील विखरण गावात शिरपूर शहादा रस्त्यावर ओव्हरटेक (Overtake) करण्याच्या नादामध्ये वाहनावरील नियंत्रण सुटल्याने लक्झरी बस (Luxury Bus) चालकाकडून थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशादर्शक फलकावरच वाहन धडकले. त्यामध्ये दिशादर्शक फलकाजवळ उभ्या असलेल्या 65 वर्षीय आजोबांना देखील वाहनाची धडक बसली. यामध्ये 65 वर्षीय आजोबा गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेचा सर्व चित्तथरारक करणारा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. (Luxury bus hits a person with a banner while overtaking)

ओव्हरटेक करण्याच्या नादात लक्झरी बसची फलकाला धडक

शहादाकडून शिरपूरच्या दिशेने निघालेल्या लक्झरी बसने समोर चालणाऱ्या डम्परला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशादर्शक फलकालाच वाहन ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये फलकाजवळ उभे असलेले 65 वर्षीय आजोबांना देखील या वाहनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून त्यामध्ये आजोबा गंभीररीत्या जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त ठिकाणी धाव घेत आजोबांना उचलून उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. संबंधित वाहनचालक हा संधीचा फायदा उचलत घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही सर्व घटना बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

कर्नाटकांमध्ये बस अपघातात आठ जण मृत्यू

कर्नाटकमध्ये खाजगी बस पलटल्याने झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यात पावगडजवळ शनिवारी सकाळी खासगी बस उलटून अपघात झाला होता. अपघातानंतर काही प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 60 प्रवासी होते. (Luxury bus hits a person with a banner while overtaking)

इतर बातम्या

Kalyan Crime : कल्याण डोंबिवलीमधील “भाई” लोकांचा मुक्काम आता जेलमध्ये

Video – The Burning Truck | वाशिमकडे जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, चालकाचा वाचला जीव

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.