रसवंती यंत्रात पदर अडकला, नांदेडमध्ये 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

रसवंती यंत्रात पदर अडकला, नांदेडमध्ये 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
साडीचा पदर रसवंती यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू
Image Credit source: टीव्ही9

दुर्गा खोंड असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चाळीस वर्षीय महिलेचं नाव आहे. ती मूळ हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आसेगाव इथली रहिवाशी होती.

राजीव गिरी

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 19, 2022 | 1:14 PM

नांदेड : रसवंती यंत्रात (Sugarcane Machine) पदर अडकून महिलेला प्राण गमवावे लागले. नांदेडच्या (Nanded) ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. संबंधित महिला नांदेडच्या कौठा भागात ऊसाचा रस काढून विक्री करते. यावेळी तिच्या साडीचा पदर (Saree) रसवंती यंत्रात अडकून हा प्रकार घडला. दुर्गा खोंड असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चाळीस वर्षीय महिलेचं नाव आहे. ती मूळ हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आसेगाव इथली रहिवाशी होती. मात्र रसवंती गृहात ऊसाचा रस विकून उदरनिर्वाह करण्यासाठी ती हिंगोलीहून नांदेडला आली होती. रसवंती यंत्रात पदर अडकून अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

साडीचा पदर ऊसाचा रस काढण्याच्या मशिनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू झाला. नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. संबंधित महिला नांदेडच्या कौठा भागात ऊसाचा रस काढून विक्री करते. यावेळी तिच्या साडीचा पदर रसवंती यंत्रात अडकून हा प्रकार घडला.

उदरनिर्वाहासाठी हिंगोलीहून नांदेडला

दुर्गा खोंड असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 40 वर्षीय महिलेचं नाव आहे. ती मूळ हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आसेगाव येथील रहिवासी आहे. रसवंती गृहात ऊसाचा रस विकून उदरनिर्वाह करण्यासाठी ती हिंगोलीहून नांदेडला आली होती. रसवंती यंत्रात पदर अडकून महिलेला प्राण गमवावे लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

पेट्रोल पंपावरून निघाले अन् भरधाव टेम्पोखाली सापडले, लातूर जिल्ह्यात भीषण अपघात, दोन ठार, एक जखमी

मुंबईत मस्करीची कुस्करी, होळीला रंगांचा फुगा मारला, बाईकचा धक्का लागून सायकलस्वाराचा मृत्यू

किस्सा नहीं, कहानी बन गई; शेततळ्यांवरील व्हिडीओसाठी फेमस, अमरावतीच्या जोडगोळीचा बुडून मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें