AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Market Crash : युद्धाचे भयानक परिणाम, आज सकाळी शेअर बाजार उघडताच धडाम

Stock Market Crash : मध्य पूर्वेतील युद्धाचे आता परिणाम जाणवू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजाराचा पाया हादरला आहे. कच्चा तेलाचे भाव वाढून 115 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर अशा प्रकारे वाढले तर महागाई भडकू शकते.

Stock Market Crash : युद्धाचे भयानक परिणाम, आज सकाळी शेअर बाजार उघडताच धडाम
Share Market Crash
| Updated on: Mar 09, 2026 | 9:52 AM
Share

भारतीय शेअर बाजार आज उघडताच मोठी घसरण दिसून आलीय. मागच्या आठवड्यातही सेंसेक्समध्ये घसरण झाली होती. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पहिल्या सत्रात बाजार उघडताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेंसेक्स 2400 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीच्या इंडेक्सने सुद्धा 700 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह व्यवहाराची सुरुवात केली. या घसरणीमागे अनेक कारणं आहेत. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाशी संबंधित ही कारणं आहेत.

Indian Stock Market मध्ये मागच्या आठवड्यातही असचं भितीदायक चित्र होतं. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी दोन्ही इंडेक्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. शुक्रवारी BSE सेंसेक्स दिवसभराच्या घसरणीसह बाजार बंद होताना 1097 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता. NSE Nifty 315 अंक घसरुन बंद झालेला.

आधीपासूनच परदेशातून रेड सिग्नल

भारतीय शेअर बाजाराला आधीपासूनच परदेशातून रेड सिग्नल मिळत होते. मिडिल ईस्टमधील युद्ध भीषण बनल्यानंतर आशियाई शेअर बाजार अजून कोसळले. जापानचा निक्केई 4000 अंकांपेक्षा जास्तने कोसळून ट्रेड करताना दिसला. हाँगकाँगचा हँगसेंग इंडेक्स 800 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. त्याशिवाय दक्षिण कोरियाचा कोस्पी इंडेक्सची वाईट अवस्था होती. जवळपास 7 टक्क्यापेक्षा जास्तने कोसळून ट्रेड करत होता. Gift Nifty बद्दल बोलायचं झाल्यास सोमवारी बाजार उघडताच तो क्रॅश झाला. 500 पेक्षा जास्त अंकांनी कोसळून व्यवहार करत होता.

त्याचा बोजा सर्वसामान्यांवर येणार

मध्य पूर्वेतील युद्धाचे आता परिणाम जाणवू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजाराचा पाया हादरला आहे. कच्चा तेलाचे भाव वाढून 115 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर अशा प्रकारे वाढले तर महागाई भडकू शकते. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या तर दैनंदिन वस्तू महागणार. त्याचा बोजा सर्वसामान्यांवर येणार. इराणकडून आखाती देशांमधील तेल रिफायनरीवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळे काही देशांनी तेल उत्पादन कमी केलय. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून वाहतूक करणाऱ्या जहाजांवर सुद्धा हल्ले होऊ शकतात. हे सुद्धा कच्चा तेलांचे दर वाढण्यामागचं एक कारण आहे.

Follow Us
राज ठाकरेंसमोर चिमुकलीचं शिवरायांच्या कर्तृत्वावर भाषण!
राज ठाकरेंसमोर चिमुकलीचं शिवरायांच्या कर्तृत्वावर भाषण!.
टी-20 विश्वचषकात भारताच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्वीट
टी-20 विश्वचषकात भारताच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्वीट.
चौकशीतून सत्य बाहेर यावं हीच जनतेची अपेक्षा; राजेश टोपेंची मागणी
चौकशीतून सत्य बाहेर यावं हीच जनतेची अपेक्षा; राजेश टोपेंची मागणी.
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.