कल्याण : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पाऊले उचलण्यास सुरू केली आहे. गुन्हेगारी (Criminal) पार्श्वभूमी असलेल्या दोन गुंडाची जेल (Jail)मध्ये रवानगी करण्यात आली आहे. आणखी पाच जणांवर ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून मारामारी आणि इतर घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. या गुंडांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीविरोधात ठोस कारवाई करण्याचे आदेश दिल आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू केली आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची रवानगी आता थेट जेलमध्ये केली जात आहे. (Two goons from Kalyan Dombivali were sent to jail)