Rickshaw Accident | धावती रिक्षा उलटून दोन वेळा पलटी, नांदेडमध्ये अपघात, 9 विद्यार्थिनी जखमी

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथे हा अपघात झाला. धावती रिक्षा पलटल्यामुळे नऊ विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. पारवा गावातील या विद्यार्थिनी ऑटोमध्ये बसून हिमायतनगर इथे शाळेला जात होत्या.

Rickshaw Accident | धावती रिक्षा उलटून दोन वेळा पलटी, नांदेडमध्ये अपघात, 9 विद्यार्थिनी जखमी
नांदेडमध्ये रिक्षाचा अपघात
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 2:40 PM

नांदेड : रिक्षा उलटून तब्बल नऊ विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेला निघालेल्या विद्यार्थिनींना अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडमध्ये ऑटो रिक्षाला हा अपघात झाला. जखमी विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं?

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथे हा अपघात झाला. धावती रिक्षा पलटल्यामुळे नऊ विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. पारवा गावातील या विद्यार्थिनी ऑटोमध्ये बसून हिमायतनगर इथे शाळेला जात होत्या. त्यावेळी करंजी गावाजवळ ऑटो पोहोचताच तांत्रिक बिघाडामुळे चालत्या ऑटोने दोन वेळा पलटी घेतली.

नऊ विद्यार्थिनी जखमी

या अपघातात नऊ विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यातील गंभीर असलेल्या दोन विद्यार्थिनींना उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आलं आहे. तर किरकोळ जखमी असलेल्या सात विद्यार्थिनींवर हिमायतनगरमध्ये उपचार सुरु आहेत.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शिक्षण विभागाने प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीचा संप सुरु असल्याने या विद्यार्थिनींना नाईलाजाने ऑटोने प्रवास करावा लागत आहे. त्यातच अपघाताच्या घटना होत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

संबंधित बातम्या :

बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेल्या प्रेमी युगुलाला मारहाण, अकोल्यात संतापजनक प्रकार

30 वर्षीय महिलेचा डोकं उडवलेला नग्न मृतदेह, माथेरानच्या लॉजमधील हत्याकांडाचे धागे गोरेगावपर्यंत कसे पोहोचले?

VIDEO | कुटुंब रंगलंय ‘Fighting’मध्ये, मुलगी-मामा आणि आई, औरंगाबादेत भररस्त्यात हातघाई