Ratnagiri Murder | तू माझा मुलगा नाहीस, 17 वर्षीय मुलाला बापाने हिणवलं, लेकाने जीवच घेतला

आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या वडिलांची मुलाने हत्या केली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पुनस गावातील बौद्धवाडी येथे 17 वर्षीय मुलाने बापाची हत्या केली.

Ratnagiri Murder | तू माझा मुलगा नाहीस, 17 वर्षीय मुलाला बापाने हिणवलं, लेकाने जीवच घेतला
मयत पिता रविंद्र कांबळे
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 8:42 AM

रत्नागिरी : आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या बापाचा मुलाने काटा काढला. 17 वर्षीय मुलाने बापाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri Crime) राजापूर तालुक्यातील पुनस गावातील बौद्धवाडी येथे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता ही घटना घडली आहे. रविंद्र रावजी कांबळे असं मृत्यू झालेल्या 40 वर्षीय पित्याचं नाव आहे. 17 वर्षीय मुलानं बापाच्या डोक्यात हातोडा (Hammer) मारल्याचा आरोप आहे. तू माझा मुलगा नाहीस, असं मुलाला बोलत बाप आईच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा दावा केला जातो. अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या वडिलांची मुलाने हत्या केली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पुनस गावातील बौद्धवाडी येथे 17 वर्षीय मुलाने बापाची हत्या केली. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता ही घटना घडली.

चारित्र्याच्या संशयातून मध्यरात्री भांडण

रविंद्र रावजी कांबळे असं मयत पित्याचं नाव आहे. रविंद्र आपल्या पत्नीवर सतत संशय घेत असत. शिवाय, आपल्या 17 वर्षीय मुलाला देखील तू माझा मुलगा नाहीस असं हिणवत असत. याच गोष्टीवरून सोमवारी मध्यरात्री घरात भांडण झाले.

बापाच्या डोक्यात हातोडा मारला

यावेळी 17 वर्षीय मुलाने बापाच्या डोक्यात हातोडा मारला. त्यामध्ये रविंद्र जबर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना लगेचच रत्नागिरी जिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले. पण, गंभीर जखमी झालेल्या 40 वर्षीय रविंद्र कांबळे यांचा मंगळवार 22 मार्च रोजी मृत्यू झाला. यानंतर अल्पवयीन मुलावर भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

 अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

सव्वा महिन्यांच्या बाळाची हत्या, मृतदेह ओव्हनमध्ये, जन्मदात्रीवरच संशय

23 वर्षीय युवकाचे हत्या प्रकरण, तीन वर्षांपासून फरार तिघे अखेर जेरबंद