AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र हादरला ! डॉक्टरांना ही बसला धक्का, यशश्री शिंदेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आलं समोर

Yashashree Shinde : यशश्री शिंदे हिच्या खुनाने महाराष्ट्र हादरला आहे. या तरुणीचा वयाच्या २० व्या वर्षी एकाने खून केला आहे. हा खून कशामुळे करण्यात आला. या मागे अजून कोणाकोणाचा हात होता याचा तपास सुरु आहे. पण त्याआधी तिचा पोस्टमॉर्टम करताना डॉक्टरांना ही धक्का बसला आहे.

महाराष्ट्र हादरला ! डॉक्टरांना ही बसला धक्का, यशश्री शिंदेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आलं समोर
यशश्री शिंहे हिचा मृतदेह एका निर्जन स्थळी आढळला. उरण पोलीस तपास करत आहेत.
| Updated on: Jul 29, 2024 | 5:59 PM
Share

उरणमधील 20 वर्षीय तरुणी यशश्री शिंदेच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडालीये. यशश्री शिंदे गुरुवारी घरुन निघाली पण ती परतलीच नाही. शुक्रवारी रात्री कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ मृतदेह आढळला. जो यशश्री शिंदे हिचाच असल्याचं चौकशीत समोर आलं. शवविच्छेदन करताना मृतदेहाची अवस्था पाहून डॉक्टरांना ही धक्का बसला. यशश्री शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला याची रिपोर्ट समोर आला आहे. शवविच्छेदन करताना तिच्यावर बलात्कार झाला आहे का याची देखील तपासणी करण्यात आली. पण तसं काहीही झालं नसल्याचे निष्पन्न झाले आहे. खून हा एकाच व्यक्तीने केल्याचं प्रथमदर्शनी रिपोर्टमध्ये समोर आलंय.

2019 मध्ये यशश्रीवर लैगिंक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली याच व्यक्तीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.  ज्यामुळे तो जवळपास 6 महिने तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा तिचा पाठलाग सुरु केला. तिचा काट काढण्याचं त्याने ठरवलं. मृतदेह जेव्हा ताब्यात घेण्यात आला तेव्हा तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. प्राण्यांकडून तिच्या शरीराचे लचके तोडले असल्याचे प्रथम दिसून आले. आता आरोपीला पकडण्यासाठी चार टीम रवाना झाल्या आहेत.

नवी मुंबईतील उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी माहिती दिली की, यशश्री शिंदे हा वाणिज्य शाखेची पदवीधर ती एका खासगी कंपनीत डेटा काम करत होती. गुरुवारी सकाळी ती मित्राच्या घरी जाते असं सांगून निघाली होती. पण रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंब चिंतेत आलं. त्यानंतर वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

शुक्रवारी रात्री उरण पोलिसांना एक मुलगी गंभीर अवस्थेत पडली असल्याची माहिती मिळाली. प्राण्यांनी चावा घेतल्याने तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. भटक्या प्राण्यांनी तिचे मास खाल्ले होते. कमरेवर आणि पाठीवर चाकूच्या जखमा होत्या. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह मिळाल्यानंतर यशश्रीच्या कुटुंबियांना बोलवून तिचा ओळख पटवायला सांगितली. त्यानंतर तिच्या कपड्यांवरुन हा मृतदेह तिचाच असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. या हत्येमागे नक्कीच दाऊद शेख असेल असा आरोप त्यांनी पोलिसांकडे केला.

ड्रायव्हर असलेल्या दाऊद शेखने 2018 मध्ये देखील यशश्री शिंदेला आपल्या जाळ्यात ओढलं. 2019 मध्ये दाऊदने यशश्रीचे शारीरिक शोषण केल्याचं देखील समोर आले आहे. त्यामुळेच दाऊदवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आसला होता. यानंतर तो सहा महिने तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर येताच दाऊद पुन्हा एकदा यशश्रीला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.