
कल्याण : कल्याणमध्ये शिवसेना माजी नगरसेवकाचा वाढदिवस गाजावाजा करत साजरा करण्यात आला (Kalyan Former Corporator Birthday). शेकडो समर्थक जमले. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याच दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणीतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Kalyan Former Corporator Birthday Celebration And Firing).
केडीएमसीचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांचा आज वाढदिवस आहे. रात्री 12 वाजताच गवळी यांचे शेकडो समर्थक त्यांच्या कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात असलेल्या कार्यालयात जमा झाले. माजी नगरसेवक नवीन गवळी यांचा वाढदिवस गाजावाजा करीत साजरा करण्यात आला. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
वाढदिवस साजरा केल्यानंतर नवीन गवळी हे त्यांच्या घरात गेले. त्यानंतर मात्र एक धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्या कार्यालयासमोर त्यांचे काही समर्थक उभे असताना त्याठिकाणी निलेश गवळी आणि महेश भोईर हे दोघे जण आले. निलेश गवळीचा काही महिन्यांपूर्वी जगदीश राठोड नावाच्या तरुणासोबत भांडण झाले होते. निलेश जगदीश यांच्यात चर्चा सुरु असताना निलेशसोबत असलेल्या महेश भोईर यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले (Kalyan Former Corporator Birthday Celebration And Firing).
या दरम्यान, महेशने रिव्हॉल्वर काढली. त्याने गोळीबार केला. एक गोळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला भेदून गेली. या दरम्यान, गोंधळ उडाला, पळापळ झाली. या प्रकरणात कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
याआधीही काही नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये अनेकदा हाणामारी झाली आहे. मात्र, गोळीबार झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ठोस कारवाई केली जाईल असे कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.
विरारमध्ये चेन स्नॅचिंग करणारे सराईत आरोपी अटकेत, 5 लाख 74 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्तhttps://t.co/OsFYl0ra3p#VirarPolice #ChainSnatcher
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
Kalyan Former Corporator Birthday Celebration And Firing
संबंधित बातम्या :
सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवणाऱ्या विद्यार्थ्याच्या अटकेसाठी NCB घरी, आरोपीने अंगावर कुत्रे सोडले