AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon blast case | ‘सकाळी लवकर उठू शकत नाही’, साध्वी प्रज्ञा ठाकूरने सांगितलं कोर्टात

Malegaon blast case | मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर कोर्टात हजर. सध्या हा खटला कुठपर्यंत पोहोचलाय?. काय आहे हे मालेगाव स्फोट प्रकरण?. या स्फोटात किती नागरिकांचा मृत्यू झाला होता?

Malegaon blast case | 'सकाळी लवकर उठू शकत नाही', साध्वी प्रज्ञा ठाकूरने सांगितलं कोर्टात
bjp mp pragya thakurImage Credit source: PTI
| Updated on: Sep 25, 2023 | 10:16 PM
Share

भोपाळ : मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर सोमवारी NIA कोर्टात हजर झाल्या. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर भाजपाच्या खासदार आहेत. वर्ष 2008 मधील मालेगावमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाच हे प्रकरण आहे. या प्रकरणातील सात आरोपींपैकी प्रज्ञा ठाकूर एक आहे. अन्य आरोपी हजर झाल्यानंतर जवळपास दोन तासांनी दुपारी 2 वाजता साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर कोर्टात हजर झाल्या. आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असल्याने सकाळी लवकर उठू शकत नाही, असं प्रज्ञा ठाकूर यांनी न्यायालयात सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने आरोपींची जबानी नोंदवून घेण्यासाठी प्रकरण 3 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केलय. अभियोजन पक्षाने 14 सप्टेंबरला न्यायालयाला सूचित केलं होतं की, साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय.

साक्षीची रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर न्यायालय गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (CRPC) कलम 313 अंतर्गत आरोपींची जबानी नोंदवली जाते. फक्त सहा आरोपी प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनेंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (सेवानिवृत्त) रमेश उपाध्याय, अजय रहीरकर, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी न्यायालयात हजर झाले. सुधाकर द्विवेदी यावेळी हजर नव्हते. सुधाकर द्विवेदी यांच्या वकिलाने ते अनुपस्थित राहण्याासठी धार्मिक अनुष्ठानच कारण दिलं. न्यायालयात हजर राहण्यासाठी सवलत मागितली. न्यायालयाने द्विवेदीची याचिका फेटाळून लावली.

काय आहे मालेगाव स्फोट प्रकरण?

29 सप्टेंबर 2008 रोजी उत्तर महाराष्ट्रात मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ बॉम्ब स्फोट झाला होता. यासाठी मोटरसायकलचा वापर झाला होता. या स्फोटामुळे 6 नागरिकांचा मृत्यू झाला होता. 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. 2011 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं. त्याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास केला.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना