
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील मालाडा येथील एक हादरवणारा आणि अस्वस्थ करणारा व्हिडीओ समोर आला होता. त्यात एका बिल्डींगमध्ये राहणाऱ्या माणसाने 9 व्या मजल्यावरून एका मांजराला थेट खाली फेकल्याने मांजराचा मृत्यू झाला होता, त्यामुळे चांगलीच खळबळ माजली. त्या घटनेचं सीसीटीव्ही फूटजेही खूप व्हायरल झाला होता. मुक्या प्राण्यांचा असा जीव घेतल्याने नागरिक संतापले होते. मात्र आता मुंबईतील बोरिवलीमध्ये या अशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसत असून याप्रकरणी 79९ वर्षाच्या वृध्द इसमा विरोधात गुन्हा दाखर करण्यात आला आहे. त्यानेच एक मांजरीला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली फेकलं आणि त्यामुळे तो मुका जीव मरण पावला. विलास पाठारे असे त्यांचे नाव असल्याचं समजतं.
त्या इमारतीत काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेकडील बाभई परिसरातील कृष्णा क्लासिक नावाच्या इमारतीत ही घटना घडली आहे. या इमारतीमध्ये म्हात्रे कुटुंबीय राहतात आणि त्यांनी चॉकलेट नावाचे एक मांजर पाळले होते. मात्र रविवारी त्यांच्या घरात साफसफाईचे काम सुरू होते. म्हणून त्यांनी काही वेळासाठी त्यांच्या मांजरीला घराबाहेर ठेवलं होत.
काम संपल्यावर म्हात्रे काकू या त्यांच्या मांजरीला आणायला बाहेर गेल्या, मात्र त्यांना चॉकलेट हे मांजरक कुठेच दिसलं नाही. त्यांन तिला हाका मारत बरीच शोधाशोधल केली. मात्र अचानक इमारतीखाली असलेल्या पंपाशेजारी ती मांजर त्यांना मृतावस्थेत दिसली. ते पाहून त्या हादरल्यात. थोड्यावेळापूर्वीच घराबाहेर ठेवलेली मांजर अचानक कशी मरण पावली हे त्यांना समजेचना.
अखेर म्हात्रे कुटुंबियांनी इमारतीचे सीसीटीव्ही चित्रिकरण तपासले,त्यात जे दिसलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. म्हात्रे यांच्याच इमारतीमध्ये राहणारे विलास पाठारे (वय 79) यांनी त्या मांजराला काठीने मारहाण केली . एवढंच नव्हे तर ते त्यांच्या हातातील काठीने मांजरीला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलताना दिसले. त्यामुळे पळत असताना मांजर खाली पडलं आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी म्हात्रे यांनी तक्रार केल्यानंतर बोरिवली पोलीस ठाण्यात पाठारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वृध्द असल्याने त्यांच्या घरी जाऊन पुढील कारवाई केली जाईल, असे बोरिवली पोलिसांनी सांगितलं.