AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : क्रूरतेचा कळस ! त्याने मांजराला चक्क 9 व्या मजल्यावरून फेकलं, शॉकिंग CCTV फुटेज व्हायरल

अत्यंत हादरवणारी अशी ही घटना त्या इमारतीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Mumbai Crime : क्रूरतेचा कळस ! त्याने मांजराला चक्क 9 व्या मजल्यावरून फेकलं, शॉकिंग CCTV फुटेज व्हायरल
त्याने मांजराला चक्क 9 व्या मजल्यवरून फेकलं, शॉकिंग फुटेज व्हायरल Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 12, 2025 | 1:05 PM
Share

मुंबईतील एक अतिशय अस्वस्थ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका बिल्डींगमध्ये राहणाऱ्या माणसाने 9 व्या मजल्यावरून एका मांजराला थेट खाली फेकल्याचं दिसत आहे. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे अतिशय थंड डोक्याने केलेल्या या कृतीनंतर त्या इसमाने शांतपणे खाली वाकून ते मांजर पडलं की नाही याचीही खात्री केली. त्या बिल्डींगमध्ये 9 व्या मजल्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झालेली असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या घटनेत त्या बिचाऱ्या मुक्या जीवाचा, पाळीव मांजराचा हकनाक बळी गेला.

मिळालेल्या माहितीनुसापर, मालाडच्या मालवणी परिसरातील एक बिल्डींगमध्ये ही भयानक घटना घडली असून खाली फेकलं गेल्याने अवघ्या 15 महिन्यांचे ते पाळीव मांजर मृत्यूमुखी पडलं. रिपोर्टनुसार, कासम सय्यद असे त्या इसमाचं नाव असून तो याच इमारतीमधील रहिवासी आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवल्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्या नराधमाच्या या कृत्याने संताप व्यक्त होत असून मांजराच्या गेलेल्या जीवासाठी हळहळ व्यक्त होत आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.

व्हिडीओ व्हायरल

या घटनेचं शॉकिंग सीसीटीव्ही फूटेज समोर आलं असून ते सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झालंय. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या सुरुवातीला खिडकीजवळील बुटांच्या रॅकवर एक मांजर उभी असल्याचं दिसलं. थोड्या वेळाने, एक माणूस बॅग घेऊन तिथे आला, मांजरीकडे पाहिलं आणि पुढे गेला. मात्र त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून सगळेच हादरले.

पुढे जाऊन त्याने बॅग खाली ठेवली, लिफ्टचं बटण दाबलं पण अचानक तो मागे फिरला, रॅकवर उभ्या असलेल्या मांजराजवळ गेला, त्याने आधी त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला उचललं आणि त्यानंतर त्याने शेजारीच असलेल्या खिडकीतून त्या मांजराला धाडकन खालीच फेकून दिलं. यामुळे ते मुकं जनावर मेटल शीटवर आपटलं आणि त्याचा तत्काळ मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी कासम सय्यदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईची मागणी

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून प्रत्येक यूजर हळहळत आहे, त्या मुक्या जनावरला न्याय मिळवून देण्यासाठी त्या नराधम आरोपीवर कठोर कारवाई करत कडक शिक्षा देण्याची मागणी प्राणीप्रेमींकडून केली जात आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.