AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जा शोनू जा… आता परत कधीच नाही येणार, नेहमी आनंदी राहा; भिंतीवर मजकूर लिहून त्याने जग सोडलं

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा भिंतीवर लिहिलेली नोट पाहून त्यांना धक्काच बसला. भिंतीवर 'जा माझ्या प्रिये, मी आता कधीच परत येणार नाही, फक्त आनंदी राहा' असे लिहिलेले आढळले.

जा शोनू जा... आता परत कधीच नाही येणार, नेहमी आनंदी राहा; भिंतीवर मजकूर लिहून त्याने जग सोडलं
भिंतीवर नोट लिहून तरूणाने संपवलं आयुष्य
| Updated on: May 05, 2023 | 3:52 PM
Share

रायपूर : छत्तीसगडमधील अंबिकापूर (Chattishgadh) येथील सुभाषनगर भागात तरुणाच्या आत्महत्येची (man killed himself) धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 3 मे रोजी सायंकाळी एका तरुणाने भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा भिंतीवर लिहिलेली सुसाईड नोट पाहून त्यांना धक्काच बसला. भिंतीवर ‘जा माझ्या प्रिये, मी आता कधीच परत येणार नाही, फक्त आनंदी राहा’ असे लिहिलेले आढळले. ही घटना प्रेमप्रकरणातून असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

जीतन असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचे वय 32 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. अंबिकापूर येथील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर येथील येथे भाड्याच्या घरात हा युवक दीड वर्षांपासून राहत होता. या घरात मामा आणि भाचा असे दोघेही राहतात, असे त्याच्या मामाने पोलिसांना सांगितले. मृत तरूणाचे मामा हे 1 मे रोजी लग्नात सहभागी होण्यासाठी गावी गेले होते. 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते पत्नीसह सुभाष नगर येथील भाड्याच्या घरात परतले असता दरवाजा आतून बंद होता.

आवाज देऊनही आणि मोबाईलवर कॉल करूनही दार उघडले नाही, म्हणून त्याने घरमालकाला माहिती दिली. दरवाजा तोडला असता त्याचा मृतदेह साडीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

आपल्या भाच्याला लटकलेले पाहून मामाने गांधीनगर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची माहिती दिली. पोलिस भाड्याच्या घरात पोहोचले तेव्हा त्यांना भिंतीवर ‘जा माझ्या प्रिये, आता मी कधीच परत येणार नाही, फक्त आनंदी राहा’ असे लिहिलेले दिसले. पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला. त्यानंतर 4 मे रोजी पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?