निलंबित IAS पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांच्या घराची झाडाझडती

निलंबित IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या पुण्याच्या बाणेर येथील बंगल्याची पोलिसांनी साडेचार तासांहून अधिक वेळ तपासणी केल्याचे उघडकीस आले आहे.

निलंबित IAS पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांच्या घराची झाडाझडती
manorama khedkar and puja khedkar
| Updated on: Sep 18, 2025 | 8:18 PM

निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील बाणेर येथील बंगल्यावर आज सकाळपासून पोलिसांनी झाडाझडती मोहिम सुरू केली आहे. पूजा हिची आई मनोरमा खेडकर यांच्या प्रतापानंतर पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी एका मिक्सर चालकाचे अपहरण केल्याचे प्रकरण समोर आले होते.

प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या पुण्याच्या बाणेर येथील बंगल्यावर सकाळी साडेअकरा वाजता नवी मुंबईतील रबाळे पोलिस स्टेशन आणि पुण्यातील चतुर्श्रृंगी पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी आले. त्यांनी या बंगल्याची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण बंगल्याची कसून तपासणी केली असून ही झाडाझडती साडेचार तासांहून अधिक काळ सुरू होती.

या तपासणीदरम्यान मनोरमा खेडकर यांचे वकील देखील उपस्थित आहेत. मात्र, पोलिसांनी तपासणीची संपूर्ण प्रक्रिया गुप्त ठेवली आहे. माध्यमांना बंगल्यात प्रवेश नाकारण्यात आला असून आत नेमक्या कोणत्या प्रकारे पंचनामा आणि तपासणी चालू आहे याची अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. या कारवाईनंतर परिसरात मोठी चर्चा रंगली असून, खेडकर प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 किरकोळ अपघातावरुन अपहरण

एका मिक्सर चालकाशी वाहन चालवताना झालेल्या किरकोळ अपघातावरुन दिलीप खेडकर यांनी त्याचे अपहरण केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. शनिवारी ( १३ सप्टेंबर ) रात्री मिक्सर चालक तरुण प्रल्हाद कुमार ( २२ वर्षे ) याच्या मिक्सर आणि दिलीप खेडकर यांच्या लँड क्रुझर कारचा किरकोळ अपघात झाला. अपघातात गाडीला घासले गेल्याने दिलीप खेडकर यांनी चालकाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. चालकाने नकार देताच खेडकर यांनी चालकाला पोलीस ठाण्याते नेण्यासाठी जबरदस्ती गाडीत बसवले आणि पोलीस ठाण्याऐवजी त्याचे अपहरण करीत आपल्या पुण्यातील घरात डांबून ठेवल्याचे उघडकीस आले आहे.