11व्या वर्षी भावोजीशी लग्न, 23व्या वर्षी दिरावर प्रेम… घर सोडून मंदिरात घेतला आश्रय; नेमकं काय घडलं

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिलेने भावोजीशी आणि नंतर दिराशी लग्न केले आहे. आता कुटुंबीय दोघांना जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत.

11व्या वर्षी भावोजीशी लग्न, 23व्या वर्षी दिरावर प्रेम… घर सोडून मंदिरात घेतला आश्रय; नेमकं काय घडलं
Crime News
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 04, 2025 | 3:16 PM

अशी एक कहाणी समोर आली आहे जी सर्वांसाठीच धक्कादायक आहे. एका 23 वर्षीय मुलीचं लग्न तिच्या भावोजीशी तेव्हा लावून देण्यात आलं, जेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. म्हणजेच मुलीचा भावोजीशी बालविवाह लावून देण्यात आला होता. पण कालांतराने ती पुन्हा प्रेमात पडली. तिचे भावोजीच्या धाकट्या भावावर प्रेम दडलं. दोघेही घर सोडून पळून गेले आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले आहेत.

आता दोघांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. दोघांनी पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. खरं तर, मुलीची कहाणी खूप वेदनादायी आहे. ती खूप लहान असताना तिच्या बहिणीचा मृत्यू झाला होता. बहिणीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तिचं लग्न वयाच्या 11 व्या वर्षी तिच्या भावोजीशी लावून दिलं होतं. मुलगी तिच्या भावोजीपेक्षा वयाने खूपच लहान होती. पण कुटुंबीयांनी बालविवाह केल्यामुळे तिला काही बोलता आले नाही. तिने कुटुंबीयांनी टाकलेली जबाबदारी निभावली आहे.
वाचा: ‘… तर मी इंग्लंडला निघून जाईन’ भारत-पाक युद्धावर पाकिस्तानी नेत्याची मजेशीर प्रतिक्रिया

पतीने कधीच प्रेम आणि सन्मान दिला नाही

कुटुंबीयांनी मुलीचं लग्न तिच्या भावोजीशी यासाठी लावलं, जेणेकरून ती आपल्या बहिणीच्या मुलांचं संगोपन करू शकेल. मुलीने सांगितलं की, लग्नानंतर तिचं आयुष्य नरक बनलं होतं. तिचा पती (भावोजी, ज्याच्याशी तिचं लग्न झालं) दारू पितो. एवढंच नाही, तर दारू पिऊन तिची मारहाण करतो. मुलीने सांगितलं की, तिच्या पतीने तिला कधीच प्रेम आणि सन्मान दिला नाही.

दिरासोबत गेली पळून

मुलीने सांगितलं की, तिची सासूही तिला टोमणे मारायची. अशा कठीण काळात तिच्या दिराने तिला आधार दिला आहे. दिर मजुरी करतो. दोघांमध्ये मैत्री झाली. हळूहळू त्यांच्यात प्रेम निर्माण झालं. दोघे तासन्तास फोनवर एकमेकांचं दुखः शेअर करायचे. अखेर तिने हे नातेसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला. मग 13 फेब्रुवारीला ती तिच्या दिरासोबत पळून गेली. दोघे सुमारे अडीच महिने देशातील अनेक राज्यांत फिरले.

पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

ते कधी गुरुग्राममध्ये राहिले, तर कधी मंदिरांमध्ये आश्रय घेतला. आता मुलीला आणि तिच्या दिराला तिचे कुटुंबीय जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. राजस्थानमधील चुरूच्या पोलीस अधीक्षकांसमोर येऊन मुलीने सुरक्षेची मागणी केली आहे. मुलीने सांगितलं की, तिचं लग्न जबरदस्तीने लावून देण्यात आलं होतं. तिने तिच्या पतीला कधीच स्वीकारलं नाही. आता तिला आपल्या इच्छेने आयुष्य जगायचं आहे, पण तिला धोका आहे.